आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

चारधाम यात्रेकरूंच्या आरोग्यसेवा आणि सुरक्षिततेसाठी त्रिस्तरीय आरोग्य पायाभूत सुविधा तयार करणार : डॉ मनसुख मांडवीय


जीवरक्षक प्रणाली आणि आपत्कालीन वाहतुकीसाठी चारधाम महामार्गावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार

यात्रा काळात आरोग्य सेवा देण्यासाठी पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तैनात करणार

एम्स ऋषिकेश, देहरादून आणि श्रीनगर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेफरल सहाय्यासह यात्रेकरूंसाठी ड्रोनद्वारे आपत्कालीन औषधे पुरवली जाणार

Posted On: 06 MAR 2023 1:22PM by PIB Mumbai

“ देशभरातून चामधाम यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंसाठी सरकार लवकरच बळकट आरोग्यसेवा सहाय्य आणि आपत्कालीन व्यवस्थापन पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे. यात्रेकरूंना त्यांच्या प्रवासादरम्यान वैद्यकीय दृष्टिकोनातून सुविधा पुरवल्या जातील हे सुनिश्चित  करण्यासाठी ही त्रिस्तरीय  रचना असेल.” उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ धनसिंग रावत यांनी आज  आज नवी दिल्लीत  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख  मांडवीय यांची भेट   घेतल्यानंतर, मांडवीय यांनी  ही माहिती दिली. यावेळी उत्तराखंडच्या आरोग्यमंत्र्यांनी दरवर्षी चार धाम यात्रा करणार्‍या लाखो यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवा आणि आपत्कालीन पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून साहाय्यासाठी   विनंती केली.खडतर मार्गावर यात्रेकरूंना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांची आणि पक्षाघात  इत्यादीसारख्या आरोग्य आपत्कालीन परिस्थितींमुळे गेल्या काही महिन्यांत यात्रेकरूंच्या मृत्यूच्या  संख्येमद्दल त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना माहिती  दिली. यातील अनेक मृत्यू हे ज्यांना सह-विकाराने ग्रासले होते  अशा यात्रेकरूंचे होते , असेही त्यांनी सांगितले.

यावेळी  डॉ. मांडवीय यांनी भारत सरकारकडून संपूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि   "चारधाम यात्रेकरूंसाठी सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा आणि आरोग्य आपत्कालीन पायाभूत सुविधा पुरविल्या जातील" असे त्यांनी सांगितले. या आरोग्य सुविधा पुरवताना  पक्षाघाताचे (स्ट्रोक) व्यवस्थापन आणि उपचार सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक  रुग्णवाहिका आणि स्ट्रोक व्हॅनचे मजबूत जाळे नियोजित आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यात्रा मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका तैनात असतील, असेही त्यांनी सांगितले.  देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (पीजी) विद्यार्थ्यांना बळकट आरोग्य सेवा पायाभूत सुविधांचा भाग म्हणून तैनात करण्याचा प्रस्ताव आहे.  हे विद्यार्थी प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून काम करतील.पीजी विद्यार्थ्यांसाठी “हा अनुभव   कौशल्य आणि क्षमता वाढवणारा सराव  म्हणूनही कामी येईल.असे डॉ मांडविया यांनी स्पष्ट केले.

 याशिवाय यात्रेच्या उंच ठिकाणी  आपत्कालीन औषधे पुरविण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.अलीकडेच ईशान्य प्रदेशात कोविड 19 प्रतिबंधक  लसींच्या वाहतुकीसाठी ड्रोनचा यशस्वीपणे वापर करण्यात आला आहे; केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही तीर्थस्थाने  गढवाल हिमालयात 10,000 फुट उंचीवर आहेत.  औषधे पोहोचवण्यासाठी आणि ती घेण्यासाठी  अलीकडेच एम्स -ऋषिकेशने  ड्रोन सेवा सुरू केली आहे.“एम्स ऋषिकेश, देहरादून वैद्यकीय महाविद्यालय आणि श्रीनगर वैद्यकीय महाविद्यालयांमधील   तज्ञांकडून उपचारासाठी  एकीकृत केंद्र  म्हणून एक मजबूत रेफरल बॅकएंड प्रणाली विकसित केली जात आहे.हे  यात्रेकरूंच्या आरोग्यासाठी संपूर्ण  वैद्यकीय  उपचार प्रदान करेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले.

 यात्रेकरूंना हवामानाची माहिती देण्यासाठी संकेतस्थळ /पोर्टल, नवीन हवामानाशी जुळवून घेण्याचे  महत्त्व, यात्रामार्गावरील आरोग्य सुविधा , कॉल सेंटर क्रमांक, यात्रापूर्व तपासणी , आपत्कालीन साहाय्य  क्रमांक इ. नागरिक स्नेही  संवाद आणि जागरूकता  उपक्रमांद्वारे या उपाययोजनांना पाठबळ  दिले जाईल

***

Jaidevi PS/SBC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904603) Visitor Counter : 150