आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्ली इथं "वॉक फॉर हेल्थ" या मेगा वॉकेथॉनचं आयोजन

Posted On: 05 MAR 2023 1:47PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्ली इथं आरोग्यासाठी चालणे ("WalkforHealth") या मेगा वॉकेथॉनचं आयोजन केलं आहे. अनेक जणांनी उत्तम आरोग्यासाठी चालत, मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने यात उत्साही सहभाग नोंदवला. शारीरिक आणि मानसिक आरोग्य वृद्धिंगत करायला प्रोत्साहन देण्यासाठी अशा रॅलीचं आयोजन केले जाते.

पंतप्रधानांच्या फिट इंडिया या संकल्पनेनुसार, वॉकथॉन आणि यासमान कार्यक्रमांचा उद्देश नागरिकांमध्ये वर्तनात्मक बदल घडवून आणणे तसंच शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय जीवनशैलीबाबत जागरूकता पसरवणे हा आहे. अशा उपक्रमांना चालना देत तसेच आपल्या सायकलिंग क्षेत्रातल्या उत्साही भूमिकेमुळे "ग्रीन एमपी" या नावाने देखील ओळखले जाणारे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी शारीरिक क्रियाशीलतेला प्रोत्साहन देत आहेत. असंसर्गजन्य रोग (NCDs) हे देशातल्या 63% हून अधिक मृत्यूसाठी जबाबदार आहेत आणि तंबाखूचा वापर (धूम्रपान आणि धूरविरहित), मद्यपानाचा वापर, खराब आहारसवयी, अपुरी शारीरिक क्रियाशीलता आणि वायू प्रदूषण यासारख्या प्रमुख वर्तनशील जोखीम घटकांशी संबंधित असून त्यांच्याशी सहजरित्या जोडले गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज, दिनांक 5 मार्च 2023 रोजी देशभरातील जिल्हा मुख्यालयात शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि पर्यावरण पूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सायकलिंग कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. ‘स्वस्थ महिला स्वस्थ भारत या संकल्पनेवर आधारित सायक्लेथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

***

S.Thakur/S.Naik/P.Kor



(Release ID: 1904366) Visitor Counter : 163