आयुष मंत्रालय

शांघाय सहकार्य संघटनेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि पारंपरिक औषध प्रदर्शनाचे आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 02 MAR 2023 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2023  

केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी आज गुवाहाटी येथे शांघाय सहकार्य संघटने (एससीओ) अंतर्गत पारंपरिक औषधांवरील पहिल्या बी2बी जागतिक परिषदेचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले. 17 एससीओ (4 आभासी माध्यमातून) देशांमधील 150 हून अधिक प्रतिनिधी आणि हितधारक उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. याच प्रांगणात पारंपरिक औषधांवरील चार दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनही आज सोनोवाल यांच्या हस्ते झाले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात केंद्रीय मंत्री म्हणाले, “लोकांना आरोग्यसेवा देण्यासाठी तसेच सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषध पद्धतींद्वारे उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा सर्वोत्तम वापर केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र (डब्ल्यूएचओ -जीसीटीएम) जामनगर येथे भारताच्या समर्थनाने स्थापन करण्यात आले असून, पारंपरिक औषधांचे शिक्षण आणि पद्धती बळकट करण्यासाठी सदस्य देशांना आपापल्या देशांमध्ये सक्षम पावले उचलण्यास मदत होईल.”

उद्घाटन समारंभाला केंद्रीय आयुष आणि महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई मुंजपारा; म्यानमार सरकारचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ थेट खाइंग विन; मालदीवच्या उप आरोग्य मंत्री, सफिया मोहम्मद सईद आणि आयुष मंत्रालयाचे सचिव, वैद्य राजेश कोटेचा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात, केंद्रीय आयुष आणि महिला आणि बाल विकास राज्यमंत्री, डॉ. महेंद्रभाई मुंजपारा म्हणाले, “भारत शिक्षणाच्या गुणवत्तेची हमी आणि आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी (आयुष) उपचारांवर भरपूर भर देतो.

म्यानमारचे आरोग्य मंत्री डॉ. थेट खाइंग विन म्हणाले, “म्यानमारमध्ये पारंपरिक औषधांना एक अमूल्य राष्ट्रीय वारसा मानण्यात आले आहे, आपल्या संस्कृतीत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पारंपरिक औषधांच्या वाढत्या मागणीमुळे आम्ही पारंपरिक औषध विकासाच्या प्रत्येक पैलूचे समर्थन करत आहोत.”

पारंपरिक औषधे लाखो लोकांसाठी, विशेषत: विकसनशील देशांमधील ग्रामीण भागांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कसा होता याबद्दल मालदीवच्या उप-आरोग्य मंत्री सफिया मोहम्मद सईद यांनी माहिती दिली. सर्वोत्तम पद्धतींच्या गरजेवर त्यांनी भर दिला कारण सध्या आपल्याकडे उद्योगाला मदत करण्यासाठी कायदेशीर चौकट आणि मार्गदर्शक तत्त्वे नाहीत.

भारतासह 17 देशांतील 150 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, ज्यात आरोग्य मंत्री, अधिकृत प्रतिनिधी आणि एससीओ आणि भागीदार देशांतील परदेशी खरेदीदार यांसारख्या उच्चस्तरीय प्रतिनिधींचा समावेश आहे. एकूण 75 विदेशी अधिकारी आणि 13 देशांतील व्यावसायिक प्रतिनिधी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. चीन, उझबेकिस्तान, किरगिझस्तान, कझाकिस्तानचे अधिकृत प्रतिनिधी आभासी माध्यमातून सहभागी झाले.

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1903644) Visitor Counter : 144