पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तरप्रदेशातील रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी केले संबोधित


"आज मिळालेल्या नियुक्ती पत्रामुळे 9 हजार कुटुंबांना आनंद होणार आहे आणि त्यायोगे उत्तर प्रदेशात सुरक्षिततेची भावनाही वृध्दिंगत होत आहे"

"सुरक्षा आणि रोजगाराच्या या एकत्रित सामर्थ्याने उत्तरप्रदेशातील अर्थव्यवस्थेला नवीन गती दिली आहे"

"2017 नंतर उत्तरप्रदेशात आत्ता 1.5 लाखाहून अधिक पोलिसभरती झाल्याने, रोजगार आणि सुरक्षितता दोन्हींमध्ये सुधारणा झाली आहेत"

“जेव्हा तुम्ही पोलिस सेवेला आरंभ करता तेव्हा तुम्हाला हाती ' पोलिसी दांडा' मिळतो, पण देवाने तुम्हाला हृदयही दिले आहे. तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे आणि यंत्रणेलाही संवेदनशील बनवलं पाहिजे.

"तुम्ही लोकांसाठी सेवा आणि सामर्थ्य या दोन्हींचे प्रतिबिंब असू शकता"

Posted On: 26 FEB 2023 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश सरकारच्या रोजगार मेळाव्याला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. या मेळाव्यात, उत्तरप्रदेशात पोलिसांत उपनिरीक्षकांच्या थेट भरतीसाठी आणि नागरीक पोलिस, प्लाटून कमांडर तसेच अग्निशमन विभागातील दुय्यम अधिकारी अशा समकक्ष पदांसाठी नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी समाधान व्यक्त करीत ते म्हणाले की, भाजपशासित राज्यांमध्ये जवळपास दर आठवड्याला रोजगार मेळाव्याला संबोधित करण्याची संधी त्यांना मिळत आहे आणि देशाला सुध्दा सरकारी यंत्रणेत नवीन विचार आणि कार्यक्षमता आणणारे प्रतिभावान तरुण मिळत आहेत.

आज यूपीतील रोजगार मेळ्याचे विशेष महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, यामुळे 9 हजार कुटुंबांना आनंद होईल आणि उत्तर प्रदेशात सुरक्षिततेची भावना वाढेल कारण नवीन भरतीमुळे राज्यातील पोलीस दल मजबूत होईल. पंतप्रधान पुढे म्हणाले की, 2017 नंतर आत्ता यूपी पोलिसांमध्ये 1.5 लाखाहून अधिक नवीन पोलिसांची नियुक्ती झाल्यामुळे सध्याच्या रोजगार आणि सुरक्षा या दोन्ही व्यवस्थेअंतर्गत सुधारणा झाल्या आहेत.

उत्तरप्रदेशातील रोजगार मेळ्याचे विशेष महत्त्व अधोरेखित करताना आज पंतप्रधान म्हणाले की, यामुळे 9 हजार कुटुंबांना आनंद मिळेल आणि उत्तर प्रदेशातील सुरक्षिततेची भावना वाढेल कारण नवीन भरतीमुळे राज्यातील पोलीस दल मजबूत होईल. पंतप्रधान म्हणाले की, 2017 नंतर यूपी पोलिसांमध्ये आत्ता 1.5 लाखाहून अधिक नवीन नियुक्ती झाल्यामुळे सध्याच्या व्यवस्थेतील रोजगार आणि सुरक्षा दोन्हींमध्ये सुधारणा झाली आहे. 

आज, उत्तर प्रदेश त्याच्या कायदा आणि सुव्यवस्था आणि विकासाभिमुखतेसाठी ओळखला जातो, असे सांगत पूर्वीच्या परिस्थितीपासून आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या पिचलेल्या स्थितीपासून खूप भिन्न झाला असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. तसेच यामुळे रोजगार, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

डबल-इंजिन सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी तेथे झालेल्या नवीन विमानतळ, समर्पित मालवाहतूक मार्ग, नवीन संरक्षण मार्ग, नवीन मोबाइल उत्पादनांची युनिट्स, आधुनिक जलमार्ग, अभूतपूर्व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी नवीन पायाभूत सुविधा अशा उपक्रमांची यादी पंतप्रधानांनी सादर केली. ते म्हणाले, की यूपीमध्ये सर्वाधिक महामार्ग (एक्सप्रेसवे) आहेत आणि हे महामार्ग सतत विकसित केले जात आहेत. यामुळे केवळ रोजगार निर्मितीसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा होत आहे. राज्याने पर्यटनाला दिलेल्या प्रोत्साहनामुळे रोजगारात वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नुकत्याच झालेल्या जागतिक गुंतवणूक परीषदेला (ग्लोबल इन्व्हेस्टर समिट) मिळालेला उत्साहपूर्ण प्रतिसाद आणि त्यामुळे राज्यात रोजगार कसा वाढेल, याबाबतचीही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नोंद घेतली.

“सुरक्षा आणि रोजगाराच्या एकत्रित सामर्थ्याने यूपीच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे”,असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी यावेळी 10 लाख रुपयांपर्यंतच्या तारण-मुक्त कर्जाची मुद्रा योजना, एक जिल्हा एक उत्पादन योजना, भरभराट होत असलेली एमएसएमई आणि समृध्दतेकडे वाटचाल करणारी परिसंस्था (व्हायब्रंट स्टार्टअप इकोसिस्टम) यांचाही उल्लेख यावेळी केला.

नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना, पंतप्रधानांनी नवीन आव्हाने आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत सांगितले की, त्यांनी त्यांच्यामध्ये शिकणारा विद्यार्थी कायम  जागरूक ठेवला पाहिजे. त्यांनी या कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्व विकास, प्रगती आणि ज्ञान याचा सतत विकास करत राहण्यास आवाहन केले.

“तुम्ही या सेवेत आल्यावर तुम्हाला पोलिसांकडून हातात 'पोलिसाचा दांडा' मिळतो, पण देवाने तुम्हाला हृदयही दिले आहे. म्हणूनच तुम्हाला संवेदनशील राहावे लागेल आणि यंत्रणेलाही संवेदनशील बनवावे लागेल,”असे पंतप्रधानांनी नवीन भरती झालेल्या पोलिसांना आवाहन केले. उत्तम रितीने लक्ष ठेवण्याला (स्मार्ट पोलिसिंग) चालना देण्यासाठी संगणकीय आधारीत (सायबर) गुन्हे, वैद्यकीय गुन्हेगारी शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) यांसारख्या संवेदनशील आणि आधुनिक क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

नवीन भरती झालेल्यांवर सुरक्षा आणि समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असेल, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. “तुम्ही लोकांसाठी सेवा आणि शक्ती या दोन्हींचे प्रतिबिंब असू शकता”,असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या संदेशांच्या समारोप केला.

 

* * *

H.Raut/S.Patgaonkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902545) Visitor Counter : 188