पंतप्रधान कार्यालय

मेघालयातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 26 FEB 2023 1:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

 

मेघालयमध्ये प्रत्येक पात्र मतदाराला सहजतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नात सहभागी असलेल्या सर्वांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

निवडणूक आयोगाने मेघालयातील 59 विधानसभा मतदारसंघात 974 मतदान पथके पाठवली आहेत.

याव्यतिरिक्त, केवळ 35 मतदार असलेल्या कामसिंग मतदान केंद्रापर्यंत चालत जाऊन तसेच या प्रदेशात मतदान साहित्य वाहून नेण्यासाठी पारंपारिक खासी टोपल्यांचा वापर करत आयोगाच्या मतदान पथकांनी या डोंगराळ कठीण एकही मतदार मागे राहू नये, यासाठी खूप परीश्रम केले.

मेघालयच्या पत्रसूचना कार्यालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;

“प्रत्येक पात्र मतदार सहजतेने मतदान करू शकेल, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे हे आणखी एक उदाहरण आहे. या समूहाचा सहभाग असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. अशा प्रयत्नांमुळे मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्यासाठी आणि आपली लोकशाही आणखी मजबूत करण्यासाठी प्रेरणा मिळत असते.”

 

* * *

H.Raut/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1902528) Visitor Counter : 196