गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री, अमित शाह यांनी देशवासीयांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या
मूल जेव्हा आपल्या मातृभाषेत वाचते, बोलते आणि विचार करते, तेव्हा त्याची विचार करण्याची, तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची आणि संशोधन करण्याची क्षमता विकसित होते
ही गोष्ट विचारात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'नवीन शैक्षणिक धोरणा'द्वारे मातृभाषेतील शिक्षणावर भर दिला असून, तो भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरेल
आजचा दिवस, आपल्या मातृभाषेशी जोडले जाऊन, तिला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे
आपल्या मातृभाषेला समृद्ध केले, तरच देशातील सर्व भाषा समृद्ध होतील आणि देशही समृद्ध होईल, यावर भर देत, मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याची शपथ घेण्याचे अमित शाह यांचे देशवासीयांना आवाहन
Posted On:
21 FEB 2023 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2023
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री, अमित शाह यांनी देशवासीयांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या ट्वीटद्वारे सर्वांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा आपल्या मातृभाषेशी जोडले जाऊन, तिला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मातृभाषेला समृद्ध करेल तेव्हाच देशातील सर्व भाषा समृद्ध होतील आणि देशही समृद्ध होईल. आपण सर्वांनी मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याची शपथ घेतली पाहिजे.
अमित शाह म्हणाले की, मूल जेव्हा आपल्या मातृभाषेत वाचते, बोलते आणि विचार करते तेव्हा त्याची विचार करण्याची, तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची आणि संशोधन करण्याची क्षमता विकसित होते. हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'नवीन शैक्षणिक धोरणा'द्वारे मातृभाषेतील शिक्षणावर भर दिला आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्याचा हाच पाया ठरेल.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901060)
Visitor Counter : 181