युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

जी20 च्या वाय20 प्रतिबद्धता गटांतर्गत, ‘सामायिक भविष्य: लोकशाही आणि शासनातील तरुण’ या विषयावर उद्या नवी दिल्ली येथे विचारमंथन सत्राचे आयोजन

Posted On: 21 FEB 2023 11:28AM by PIB Mumbai

फेब्रुवारी 21, 2023

लोकशाही आणि शासन या क्षेत्रात तरुणांची शक्ती अधोरेखित करण्याच्या प्रयत्ना अंतर्गत आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे कार्यालय, श्रीराम वाणिज्य महाविद्यालय (ओआयपी- एसआरसीसी) आणि केन्द्र सरकारचे युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 फेब्रुवारी 2023 रोजी एक विचारमंथन कार्यशाळा आयोजित केली जात आहे.   विचारमंथन कार्यशाळा हा जी20 च्या एकूण कार्यक्रमा अंतर्गत युवा20 प्रतिबद्धता गटाच्या उपक्रमांचा एक भाग आहे.

युवक व्यवहार  आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव मीता राजीवलोचन या संमेलनाला संबोधित करतील.

"डिजिटल इंडिया," "विद्यार्थी केंद्रीत शासन" आणि "धोरण क्षेत्र" हे विचारमंथन कार्यशाळेचे तीन मुख्य विषय असतील. दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील इच्छुक आणि अनुभवी असे दोन्ही प्रकारचे उद्योजक, या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.  परदेशातील उच्च शिक्षण घेत असलेले

माजी विद्यार्थी दूरदृश्य माध्यमातून जोडले जातील.

सत्रातील मते, निष्कर्ष सत्रानंतरच्या चर्चा आणि धोरण शिफारशींचा सारांश देणार्‍या अहवालात नोंदवली जाईल.

युवक व्यवहार विभागाविषयी:

तरुण हे राष्ट्राच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करतात आणि ते सर्वात मौल्यवान मनुष्यबळ आहेत. त्यांच्या विधायक आणि सर्जनशील ऊर्जेचा उत्तम प्रकारे उपयोग करण्यासाठी, व्यक्तिमत्व निर्माण आणि राष्ट्र उभारणी या दुहेरी उद्दिष्टांचा पाठपुरावा विभाग करतो.

ओआयपी, एसआरसीसी बद्दल

परस्परातील-सांस्कृतिक आणि शैक्षणिक विनिमय कार्यक्रमांद्वारे आंतरराष्ट्रीय समन्वय निर्माण करणे आणि त्याचा विस्तार करणे हे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे कार्यालय, श्रीराम वाणिज्य महाविद्यालयाचे (ओआयपी- एसआरसीसी) ध्येय आहे. विद्यापीठे, संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसह शिक्षण, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहयोग आणि सहकार्याचा मार्ग हे सुलभ करते.

ओआयपी- एसआरसीसीने 2015 मध्ये  स्थापना झाल्यापासून, हार्वर्ड विद्यापीठ (अमेरीका), मेलबर्न विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया), उट्रेच विद्यापीठ (नेदरलँड्स) यासारख्या आघाडीच्या जागतिक शैक्षणिक संस्थांसह 175+ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची सुविधा प्रदान केली आहे. युवक व्यवहार मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, संस्कृती मंत्रालय आणि निती आयोग आदी विविध मंत्रालयांच्या सहकार्याने अनेक पथदर्शी कार्यक्रमही राबवले आहेत. दिल्लीत जागतिक बँक, दिल्लीतील युएनडीपी, आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी- एशिया पॅसिफिक (आयसीए-एपी), बँकॉकमध्ये युएनईएससीएपी, पॅरिसमध्ये युनेस्को आणि न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय यासह अनेक दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधे संवाद आणि चर्चेची सुविधा ओआयपीने उपलब्ध केली आहे. 

***

GopalC/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1900988) Visitor Counter : 157