युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
दुसऱ्या क्रमवारी मालिकेत सहभागी होण्यासाठी पर्यवेक्षण समितीने 27 कुस्तीपटूंच्या चमूला दिली मंजुरी
Posted On:
20 FEB 2023 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2023
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या पर्यवेक्षण समितीने आगामी दुसरी क्रमवारी मालिका ‘इब्राहिम-मुस्तफा’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 27 कुस्तीपटूंसह 43 सदस्यांच्या चमूला मंजुरी दिली आहे.
इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया येथे 23-26 फेब्रुवारी दरम्यान येथे होणारी ही स्पर्धा वरिष्ठ आशियायी अजिंक्यपद स्पर्धा 2023 आणि वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये चांगले मानांकन मिळवण्याच्या दृष्टीने क्रमवारी गुण मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.
भारतीय संघात 9 फ्रीस्टाईल कुस्तीपटू, 8 महिला कुस्तीपटू आणि 10 ग्रीको-रोमन कुस्तीपटू आणि 16 प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असेल.
27 कुस्तीपटूंमध्ये 3 टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स ) कुस्तीपटू म्हणजे आशु 67 ग्रीको-रोमन, भटेरी 65 किलो महिला कुस्तीपटू आणि सुजीत 65 किलो फ्रीस्टाईल कुस्तूपटू यांचाही समावेश असेल.
भारतीय संघाच्या सहभागाबाबत बोलताना ऑलिम्पिक पदक विजेत्या आणि पर्यवेक्षण समितीच्या अध्यक्षा एमसी मेरी कोम यांनी सांगितले की, ''खेळ आणि खेळाडूंना त्रास होणार नाही आणि अधिकाधिक कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय संधी मिळू शकेल हे आम्ही सुनिश्चित करत आहोत जेणेकरून त्यांना जगातील सर्वोत्तम खेळाडूं विरुद्ध स्पर्धा करण्याची संधी मिळू शकेल."
आतापर्यंत सध्याच्या 9 आणि माजी जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटूंनी द्वितीय क्रमवारी मालिकेसाठी नोंदणी केली आहे.
कुस्तीपटूंच्या तपशीलासाठी येथे क्लिक करा.
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1900736)
Visitor Counter : 223