रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वे महिनाभर सखोल सुरक्षा मोहीम राबवणार

Posted On: 19 FEB 2023 4:20PM by PIB Mumbai

 

रेल्वेगाडी रुळावरून घसरणे, धोकादायक सिग्नल पासिंग आणि इतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून भारतीय रेल्वे आजपासून महिनाभर तीव्र सुरक्षा मोहीम राबवणार आहे. यासाठी रेल्वे मंडळ, विभागीय रेल्वे आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध विभाग, लॉबी, देखभाल केंद्रे किंवा कामाच्या ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यांना अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या असामान्य घटना टाळण्यासाठी विहित केलेल्या सुरक्षित कार्यान्वयन आणि देखभाल पद्धतींची खातरजमा करून  त्यांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कामकाजाच्या पद्धतींचा सखोल आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहाय्यक लोको पायलट किंवा लोको पायलटद्वारे सिग्नलिंग प्रक्रिया आणि ब्रेकिंग पद्धतींचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवणे, गतीविषयक निर्बंधांचे पालन, ट्रॅक मशीन्स किंवा टॉवर वॅगन्सच्या चालकांचे समुपदेशन, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, कुठल्याही  शॉर्टकटचा वापर करणेयावर भर देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी विभाग, लॉबी, देखभाल केंद्रे, किंवा कामाच्या ठिकाणी अधिकाधिक वेळ देऊन कार्यान्वयन/देखभाल/कार्य पद्धती यांचे निरीक्षण करावे आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य पद्धतींविषयी चर्चा करावी आणि उपाय सुचवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

***

N.Chitale/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900545) Visitor Counter : 217