ग्रामीण विकास मंत्रालय
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत युपीए शासनाच्या 2004-14 या काळात आणि नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्य काळात झालेले निधी वितरण आणि मालमत्ता निर्मिती या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करण्याचे दिले आव्हान
Posted On:
18 FEB 2023 7:50PM by PIB Mumbai
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना, महात्मा गांधी नरेगा, अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या (MGNREGA) अंतर्गत युपीए शासनाच्या 2004-14 या काळात, आणि नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्य काळामध्ये झालेले निधी वितरण आणि मालमत्ता निर्मिती या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये नोएडा इथे सरस मेळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्या हिंदीमधील फेसबुक पोस्टचा तीव्र निषेध केला, ज्यामध्ये महात्मा गांधी नरेगा साठी अर्थसंकल्पीय तरतूद कमी करण्यात आल्याच्या वृत्त अहवालाचा दाखला दिला आहे. असे आरोप करण्याआधी काँग्रेस नेत्याने वस्तुस्थिती आणि आकडेवारी जाणून घ्यावी, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या राजवटीत मनरेगाचा बीई (अर्थसंकल्पीय अंदाज) कधीही 33,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला नाही, आणि बहुतेक सर्व आर्थिक वर्षांमध्ये, ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अयशस्वी अंमलबजावणीमुळे तो निधी वापराविना शिल्लक राहिला. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी मे 2014 मध्ये पदभार स्वीकारला, तेव्हापासून दरवर्षी योजनेसाठी खर्च होणार्या निधीच्या सुधारित अंदाजाने अर्थसंकल्पीय अंदाजाचा टप्पा पार केला, असे प्रतिपादन गिरिराज सिंह यांनी केले. या वर्षी देखील, 73,000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजाने 89,400 कोटीचा टप्पा पार केला आहे.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900398)
Visitor Counter : 164