ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
महागाई रोखण्यासाठी केंद्राने 31 मार्च 2023 पर्यंत गव्हाची राखीव किंमत आणखी कमी केली
गहू आणि गव्हाच्या उत्पादनांच्या बाजारभावात घट होण्यास मदत करण्यासाठी राखीव किमतीत कपात
Posted On:
17 FEB 2023 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2023
अन्न अर्थव्यवस्थेतील चलनफुगवट्याचा वाढता कल रोखण्यासाठी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 31 मार्च 2023 पर्यंत खालीलप्रमाणे राखीव किंमत आणखी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे:
अ. खुल्या बाजार विक्री योजना (देशांतर्गत){OMSS(D)}अंतर्गत वाजवी सरासरी गुणवत्तेच्या गव्हासाठी (FAQ)राखीव किंमत 2150 रुपये प्रति क्विंटल (संपूर्ण देशात) आणि कमी विशिष्ट गटातील गव्हासह (URS) रबी विपणन हंगाम 2023-24 मधील सर्व पिकांसाठी खाजगी पक्षांना गहू विक्रीसाठी 2125 रुपये प्रति क्विंटल (संपूर्ण देशात).
ब. राज्यांना ई-लिलावात सहभागी न होता वरील प्रस्तावित राखीव किमतींवर त्यांच्या स्वत:च्या योजनेसाठी भारतीय खाद्य महामंडळ ( FCI) कडून गहू खरेदी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
राखीव किंमतीतील कपातीमुळे ग्राहकांसाठी गहू आणि गव्हाच्या उत्पादनांची बाजारातील किंमत कमी होण्यास मदत होईल.
भारतीय खाद्य महामंडळ 17.02.2023 रोजी या सुधारित राखीव किमतींवर गव्हाच्या विक्रीसाठी तिसरा ई-लिलाव सुरू करेल जो 22.02.2023 रोजी उघडला जाईल.
मंत्र्यांच्या समितीने भारतीय खाद्य महामंडळ साठ्यामधून 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्री योजनेद्वारे (OMSS) खालीलप्रमाणे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे:
- 25 लाख मेट्रिक टन गहू ई-लिलावाच्या मार्गाने व्यापारी, पिठाच्या गिरण्या इत्यादींना भारतीय खाद्य महामंडळा द्वारे अनुसरण केलेल्या नेहमीच्या प्रक्रियेनुसार देऊ केले जातील. बोलीदार प्रति लिलावासाठी प्रति प्रदेश कमाल 3000 मेट्रिक टनासाठी ई-लिलावात सहभागी होऊ शकतात.
- 2 लाख मेट्रिक टन राज्य सरकारांना त्यांच्या योजनांसाठी @ 10,000 मेट्रिक टन प्रति राज्य ई-लिलावाशिवाय देऊ केले जातील.
- 3 लाख मेट्रिक टन सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU)/सहकारी संस्था /महामंडळ जसे की केंद्रीय भांडार/ भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ NCCF/ भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED) इत्यादींना ई-लिलावाशिवाय देऊ केले जातील.
तसेच, केंद्रीय भांडार/ भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (NCCF)/भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED)यांना त्यांच्या गरजेनुसार 3 लाख मेट्रिक टन गव्हाचे वाटप केले आहे. केंद्रीय भांडार/ भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (NCCF) / भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED) यांना अनुक्रमे 1.32 लाख मेट्रिक टन, 1 लाख मेट्रिक टन आणि 0.68 लाख मेट्रिक टन वाटप करण्यात आले.
पुढे, 10.02.2023 रोजी केंद्रीय भांडार/ भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ NCCF/भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED)आणि राज्य सरकारला विक्रीसाठी गव्हाचा दर 21.50 रुपये प्रति किलोग्रॅम इतका कमी झाला आहे. केंद्रीय भांडार/ भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (NCCF) / भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (NAFED)/ सहकारी संस्था / महामंडळे इत्यादी तसेच सामुदायिक स्वयंपाकघर /धर्मादाय संस्था / सेवाभावी संस्था इत्यादी अटींच्या अधीन राहून ते गव्हाचे पीठात रूपांतर करतील आणि ग्राहकांना कमाल किरकोळ विक्री किंमत 27.50 रुपये प्रति किलो दराने विकतील.
S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900276)
Visitor Counter : 233