पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेनचे पंतप्रधान महामहिम पेड्रो सांचेझ यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर केली चर्चा आणि संरक्षण, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील वाढत्या सहकार्याचा घेतला आढावा
डिजिटल पायाभूत सुविधा, हवामान कृती, स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकासामध्ये सहकार्य करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी दर्शवली सहमती
पंतप्रधानांनी आपल्या स्पॅनिश समपदस्थांना जी 20 साठी भारताच्या प्राधान्यक्रमांची दिली माहिती आणि भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील उपक्रमांना पंतप्रधान सांचेझ यांनी दर्शवला संपूर्ण पाठिंबा
प्रविष्टि तिथि:
15 FEB 2023 9:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला .
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या अनेक द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली.त्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला आणि संरक्षण, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अलीकडील उच्च-स्तरीय देवाणघेवाण आणि वाढत्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.त्यांनी डिजिटल पायाभूत सुविधा, हवामान कृती, स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत विकास यासारख्या मुद्द्यांवर सहकार्य करण्यास सहमती दर्शवली.
वसुधैव कुटुंबकम (एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य) या संकल्पनेवर आधारित ऐक्याचा प्रसार करण्यासाठी देण्यासाठी कार्य करण्याच्या दिशेने जी 20 अध्यक्षपदासाठीच्या भारताच्या प्राधान्यक्रमांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्पॅनिश समपदस्थांना माहिती दिली.पंतप्रधान सांचेझ यांनी त्यांच्या जी 20 अध्यक्षतेखालील भारताच्या उपक्रमांना पूर्ण पाठिंबा दर्शवला.
दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्यासाठी सहमती दर्शवली
***
ShaileshP/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1899735)
आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam