आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय येथे "आरोग्यासाठी सायकल" रॅलीचे केले आयोजन
देशभरातील सर्व 1.56 लाख आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर (एबी-एचडब्लूसी) आज सायकल संबंधित भव्य कार्यक्रमांसह इतर उपक्रमांचे आयोजन
Posted On:
14 FEB 2023 10:58AM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय (एलएचएमसी) येथे ‘आरोग्यासाठी सायकल’ या संकल्पनेवर आधारित सायकलथॉनचे आयोजन केले. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यात मोठ्या उत्साहाने तसेच मोठ्या संख्येने सहभागी झाले. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी तसेच आपल्या नागरिकांना पर्यावरणस्नेही वाहतुकीची माहिती देण्यासाठी अशा रॅलींचे आयोजन केले जात आहे.
देशभरातील सर्व 1.56 लाख आयुष्मान भारत – आरोग्य आणि कल्याण केंद्रांवर (एबी-एचडब्लूसी) आज सायकलथॉन, सायकल रॅली तसेच आरोग्यासाठी सायकल या सायकल संबंधित भव्य कार्यक्रमांसह इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या “स्वस्थ मन, स्वस्थ घर” या वर्षभर चालणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. निरोगी जीवनाविषयी जागरूकता वाढवणे हा याचा उद्देश आहे. या देशव्यापी आरोग्य मेळ्यांच्या अनुषंगाने दर महिन्याच्या 14 तारखेला सर्व एबी-एचडब्लूसी केन्द्रावर योग, झुंबा, टेलीकन्सल्टेशन (दूरध्वनी वरून वैद्यकीय माहिती देणे), पोषण अभियान, असंसर्गजन्य रोग तपासणी आणि औषध वितरण, सिकलसेल रोग तपासणी यांसारखे उपक्रम हाती घेतले जातील.
देशभरात विविध भागात आयोजित या उपक्रमाची झलक खाली पाहता येईल.
***
सुवर्णा बेडेकर/विनायक घोडे/सी यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1899093)
Visitor Counter : 212