आदिवासी विकास मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारीला नवी दिल्ली येथील ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयमवर राष्ट्रीय आदी महोत्सवाचे करणार उद्घाटन : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा
आदिवासी जमातीने उत्पादित केलेली सेंद्रीय उत्पादने ही जागतीक तापमानवाढीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यात महत्वाची भूमिका बजावतील- केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा
Posted On:
13 FEB 2023 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयमवर राष्ट्रीय आदी महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज नवी दिल्लीत माध्यमप्रतिनिधींनी ही माहिती दिली. आदिवासी व्यवहार राज्यमंत्री रेणुका सरुता याही यावेळी उपस्थित होत्या.
पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनासाठी आदिवासी जमातींचा संपूर्ण सहभाग राहावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असं मंत्र्यांनी सांगितले. जेणेकरून जागतिक तापमानवाढीने उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देण्याच्या संदर्भात ही उत्पादने महत्वाची भूमिका बजावतात असे सांगून आदिवासी जमातींकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या उत्पादनांवर भर दिला जाईल म्हणाले. याबद्दल अधिक माहिती देताना मंत्री महोदय म्हणाले की देशभरात आयोजित होणाऱ्या आदि महोत्सवात भाग घेण्यासाठी दूरवरच्या दुर्गम भागातील कलाकार हे फारश्या परिचित नसणाऱ्या आणि अद्वितिय कलाकृती घेऊन येतील. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आदिवासी उत्पादनांना शिरकाव करता यावा यादृष्टीने आदी महोत्सव हा महत्वाचा मंच आहे. आदिवासी उत्पादनांमध्ये गुणवत्ता आणि सध्याचे प्रचलित डिझाईन्स त्याचबरोबर त्याची पारंपारिकता जोपासण्याच्या हेतूने ख्यातनाम अभिकल्पकांना ट्रायफेडने आमंत्रित केले आहे असे मंत्र्यांनी सांगितले.
28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1000 हून जास्त आदिवासी कारागीर आणि कलाकार या उत्सवात भाग घेतील. 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आदिवासी पद्धतीचे खाद्यपदार्थही येथे असतील. त्यांच्यासाठी 20 खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. आदिवासींच्या खाण्यात प्रामुख्याने भरडधान्याचा समावेश असतो. वनधन उत्पादनांची विक्री आणि प्रदर्शनासाठी स्वतंत्र दालन ठेवण्याची योजना आहे. 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 39 वन धन विकास केंद्रे या महोत्सवात सहभागी होतील. महोत्सवात आदिवासी स्वातंत्र्यवीर गॅलरी राहणार आहे.
आदिवासी स्वातंत्र्यवीर गॅलरी अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाकडून आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा आणि NCZCC कडून त्या कथांचे दिवसांतून दोनदा निवेदन, देशातील जवळपास 20 राज्यांमधील जवळपास 500 आदिवासी कलाकार आदिवासी परंपरा, सुगीचे दिवस, सण, मार्शल आर्टचे प्रकार यावर आधारित ,सांस्कृतीक कार्यक्रम सादर करतील. वेगवेगळ्या राज्यांमधील अश्या कार्यक्रमातून समृद्ध सांस्कृतिक वैविध्य बघायला मिळेल.
मुख्य शहरांमधून आदि महोत्सव आयोजित करण्यांमुळे मध्यस्थांना टाळून आदिवासी कारागीरांना मोठ्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळवता येईल.
N.Chitale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898951)
Visitor Counter : 198