राष्ट्रपती कार्यालय
रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी व लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल श्री. राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींनी स्वीकारला
Posted On:
12 FEB 2023 9:16AM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपतींना पुढील नियुक्ती करण्यास आनंद होत आहे:-
(i) लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल म्हणून
(ii) सिक्कीमचे राज्यपाल म्हणून श्री. लक्ष्मण प्रसाद आचार्य
(iii) झारखंडचे राज्यपाल म्हणून श्री. सी. पी. राधाकृष्णन
(iv) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून श्री. शिव प्रताप शुक्ला
(v) आसामचे राज्यपाल म्हणून श्री. गुलाबचंद कटारिया
(vi) आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांची
(vii) आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल श्री. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून
(viii) छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल श्रीमती अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून
(ix) मणिपूरचे राज्यपाल श्री. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून
(x) बिहारचे राज्यपाल श्री. फागू चौहान यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून
(xi) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची, बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
(xii) महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
(xiii) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरील सर्व नेमणूका त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी असतील.
***
S.Pophale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898442)
Visitor Counter : 831