युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
अनुराग सिंह ठाकूर आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल यांच्या उपस्थितीत, गुलमर्ग इथे ‘तिसऱ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचे उद्घाटन; जम्मू काश्मीरमध्ये यानिमित्त नव्या 40 खेलो इंडिया केंद्रांची सुरुवात
प्रविष्टि तिथि:
10 FEB 2023 6:17PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग इथे खेलो इंडिया तिसऱ्या हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभाची घोषणा केली. यावेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल, मनोज सिन्हा, इतर मान्यवर आणि युवा खेळाडू, प्रशिक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष संदेशही पाठवला होता. पंतप्रधानांनी सहभागी खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अनेक दृष्टिनी आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरला. शांततेचा संदेश देण्यासाठी आकाशात कबूतरे सोडण्यात आली, तसेच, पारंपरिक नृत्यात, अनेकांचे पाय थिरकले. तसेच, यावेळी 40 खेलो इंडिया ई-केंद्रांचेही उद्घाटन करण्यात आले.
“उद्घाटनाच्या सोहळ्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी असल्या तरी, सर्वाधिक टाळ्या, 40 खेलो इंडिया केंद्रांच्या घोषणेच्या वेळी पडल्या,” असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. “खेलोगे, तो खिलौगे’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश जम्मू-काश्मीरने सर्वतोपरी अमलात आणला आहे असे सांगत, गेल्या 3 वर्षांत या प्रदेशाने क्रीडा क्षेत्रात दिलेले योगदान कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.
***
S.Bedekar/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898163)
आगंतुक पटल : 204