सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, 9 फेब्रुवारी 2023 रोजी 25 व्यसनमुक्ती उपचार सुविधा (एटीएफ) राष्ट्राला करणार समर्पित


सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आयोजित केलेल्या नशा मुक्त भारत अभियानामध्‍ये व्यसनमुक्ती उपचार सुविधा समर्पित करणार

Posted On: 08 FEB 2023 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी  2023

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने  09.02.2023 रोजी सकाळी 11:00 वाजता नवी दिल्लीतील 15 जनपथ येथील  डॉ. आंबेडकर आंतरराष्‍ट्रीय केंद्रामध्‍ये  भीम सभागृहात व्यसनमुक्ती उपचार सुविधा (एटीएफ) राष्ट्राला समर्पित करण्यासाठी नशा मुक्त भारत अभियानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते  या समारंभात राष्ट्राला एकूण 25 व्यसनमुक्ती उपचार सुविधांचे (एटीएफ) लोकार्पण  करण्‍यात येणार आहे.


S.Kane/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1897300) Visitor Counter : 137