पंतप्रधान कार्यालय
झारखंडमधील धनबाद इथे आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले तीव्र दु:ख
या दुर्घटनेतील पीडीतांना मदत म्हणून सानुग्रह अनुदान जाहीर
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2023 11:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
झारखंडमधील धनबाद इथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील मृतांच्या वारसाला दोन लाख रुपये तर, जखमींना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. ही मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे.
प्रधानमंत्री कार्यालयाचा ट्वीटर संदेश
"धनबादमध्ये आग लागून झालेल्या जीवितहानीमुळे अतिव दु:ख झाले आहे. या आगीत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे होवोत हीच प्रार्थना : पंतप्रधान
“धनबाद इथे लागलेल्या आगीत मृत पावलेल्यांच्या वारसाला मदत म्हणून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाईल, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान
* * *
M.Chopade/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1895255)
आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam