ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या वतीने ,“हर घर ध्यान” मोहिमेअंतर्गत ध्यान आणि मानसिक आरोग्यावर एका तासाचे पूर्वतयारीसाठी सत्र
Posted On:
31 JAN 2023 10:37AM by PIB Mumbai
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने त्यांच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी नवी दिल्लीतील विज्ञान भवन अॅनेक्स येथे “हर घर ध्यान” मोहिमेअंतर्गत ध्यान आणि मानसिक आरोग्यावर पूर्वतयारीसाठी एक तासाचे सत्र आयोजित केले होते.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते अरुणिमा सिन्हा आणि सुयश राज शिवम या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.
या सत्राच्या माध्यमातून सहभागींनी आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे महत्व सांगण्यात आले. तसेच ध्यानामधून स्वयं सुधारणेच्या निरंतर प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल, याविषयी भरपूर माहिती देण्यात आली. यावेळी सर्वांना सहज करणे शक्य आहे आणि अवलंबण्यासाठी सोपी आहे, अशा ध्यान पद्धतीच्या सरावाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

नजीकच्या भविष्यात सर्व स्तरातील लोकांसाठी ध्यान आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठीचा सराव नवीन उंचीवर नेण्याची ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाची इच्छा आहे.
***
सुवर्णा बेडेकर/सोनल चव्हाण/सी.यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1894871)
Visitor Counter : 229