पंतप्रधान कार्यालय
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या, भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या विचारांचे पंतप्रधानांकडून स्वागत
प्रविष्टि तिथि:
22 JAN 2023 5:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2023
भारताचे सरन्यायाधीश, न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या विचारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात, माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली. हा एक प्रशंसनीय विचार आहे, जो अनेकांना, विशेषतः तरुणांना उपयोगी ठरेल.”
पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे;
"भारतात अनेक भाषा आहेत, ज्यांनी आपली संस्कृती अधिक वैविध्यपूर्ण केली आहे. केंद्र सरकार भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम स्वतःच्या मातृभाषेत शिकण्याचा पर्याय, हा यापैकी एक आहे.”
* * *
R.Aghor/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1892840)
आगंतुक पटल : 355
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam