पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्लीत 21-22 जानेवारी रोजी होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
Posted On:
20 JAN 2023 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा (21- 22 जानेवारी 2023)नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/पोलीस महानिरीक्षक परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल, पुसा येथे ही तीन दिवसीय परिषद होईल.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि केंद्रीय पोलिस संघटनांच्या प्रमुखांसह सुमारे 100 निमंत्रित व्यक्ती या परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित राहतील, तर उर्वरित निमंत्रित देशभरातून आभासी पद्धतीने या परिषदेत सहभागी होतील.
सायबर क्राईम, पोलिसिंगमधील तंत्रज्ञान, दहशतवादाची आव्हाने, नक्षलवाद, क्षमता वाढवणे, कारागृह सुधारणा यासह विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे. निश्चित केलेल्या विषयांवर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पोलीस आणि गुप्तचर अधिकारी या परिसंवादात चर्चा करतील. प्रत्येक संकल्पनेअंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील सर्वोत्तम पद्धती परिषदेत सादर केल्या जातील. त्यामुळे राज्ये एकमेकांकडून त्या शिकू शकतील.
2014 पासून पंतप्रधानांनी या परिषदेबाबत उत्सुकता दाखवली. पूर्वी पंतप्रधानांची प्रतीकात्मक उपस्थिती असायची आता मात्र ते परिषदेच्या सर्व प्रमुख सत्रांना उपस्थित राहतात. ते केवळ माहिती शांतपणे ऐकत नाहीत तर मुक्त आणि अनौपचारिक चर्चेला प्रोत्साहन देतात. त्यामुळे नवीन कल्पना समोर येतात. त्यामुळे पोलिसिंग आणि अंतर्गत सुरक्षा या देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांवर देशातील आघाडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंतप्रधानांना थेट माहिती देता येईल असे अनुकूल वातावरण तयार होते.
पंतप्रधानांची दूरदृष्टी ही परिषदेसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरली असून या परिषदेत पोलिसिंग आणि सुरक्षा या भविष्यकालीन संकल्पनांवरही चर्चा होते. त्यामुळे सध्याच्या काळात केवळ सुरक्षाच नाही, तर नव्या समस्या आणि आव्हानांना तोंड देण्याची क्षमता विकसित करणे देखील शक्य आहे.
2014 पासून देशभरात वार्षिक महासंचालक परिषदा आयोजित करण्यासाठी पंतप्रधानांनी प्रोत्साहन दिले आहे. ही परिषद 2014 मध्ये गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली होती. 2015 मध्ये धोर्डो, कच्छचे रण; 2016 मध्ये हैदराबादच्या राष्ट्रीय पोलीस अकादमी, 2017 मध्ये टेकनपूरच्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) अकादमी, 2018 मध्ये केवडिया; आणि 2019 मध्ये पुणे येथे भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्था (आयआयएसइआर आणि 2021 मध्ये लखनौच्या पोलिस मुख्यालय या ठिकाणी ही परिषद झाली.
R.Aghor/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892566)
Visitor Counter : 510
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam