कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड खनिज-युक्त मातीमधून कृत्रिम-वाळूचे (एम-सॅण्ड) उत्पादन करणार

Posted On: 10 JAN 2023 2:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2023

 

मिनीरत्न कोळसा-उत्पादक कंपनी नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड त्याच्या अमलोहरी प्रकल्पातून बांधकामात वापरल्या जाणार्‍या ‘एम-सँड’ या मुख्य घटकाचे उत्पादन सुरू करण्यासाठी सज्ज आहे. हा उपक्रम नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि खाणकामाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी कोळसा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली शाश्वत पद्धतींना चालना देण्यावर आधारित आहे. पर्यावरणीय समतोलावर लक्ष केंद्रित करताना व्यवसायाच्या विविधतेवर लक्ष केंद्रित करून, कंपनीने खनिज-युक्त माती (ओव्हर बर्डन)  कच्चा माल म्हणून वापरून वाळू उत्पादन प्रकल्प उभारला आहे.

कंपनीचा हा पर्यावरणपूरक उपक्रम नदीच्या पात्रातील धूप आणि जलीय परिसंस्थांचे रक्षण करण्यास मदत करेल. अलीकडेच एनसीएलने उत्पादन सुरू करण्यासाठी  संमती मिळवली आहे ,ज्यामुळे वाळूचे व्यावसायिक उत्पादन आणि पुढील महिन्यात सुरू होणार्‍ या एम (M)-वाळूच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.

खालच्या थराचा कोळसा काढण्यासाठी तब्बल 410 दशलक्ष घनमीटर ओव्हर बर्डन काढणे आवश्यक असते. कोळशाच्या वरच्या थराला ओव्हरबर्डन (ओबी) म्हणून ओळखले जाते. याचे प्रमाण  प्रचंड असून उत्खनन केलेल्या कोळशाच्या अंदाजे 4 पट आहे.

हा नवीनतम उपक्रम, कंपनी, सरकार आणि स्थानिक भागधारकांसाठी निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) दरवर्षी सुमारे 3 लाख घनमीटर एम-वाळूचे उत्पादन करेल आणि दररोज 1000 घनमीटर वाळू तयार करण्यासाठी 1429 घनमीटर ओव्हर बर्डन वापरेल. उत्पादित केलेल्या ‘एम-सँड’चा ई-लिलाव सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या वाळूच्या तुलनेत खूपच स्वस्त आधारभूत किमतीत होईल तसेच तो उत्कृष्ट किंवा समान दर्जाचा असेल.

 

* * *

S.Kane/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1889992) Visitor Counter : 230