पंतप्रधान कार्यालय
भारतीय लष्कराने संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत अबेई येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षक दलात महिला शांतीरक्षकांची सर्वात मोठी तुकडी तैनात केल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2023 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023
भारतीय लष्कराने संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत अबेई येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षक दलात महिला शांतीरक्षकांची सर्वात मोठी तुकडी तैनात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान व्यक्त केला आहे. भारताला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सक्रिय सहभागाची परंपरा असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
भारतीय लष्करातील सार्वजनिक माहिती अतिरिक्त महासंचालक यांच्या ट्विट संदेशाला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे;
“हे पाहून अभिमान वाटतो.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची भारताची परंपरा आहे. आमच्या नारी शक्तीचा सहभाग आणखीनच स्तुत्य आहे.”
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1889232)
आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam