मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते उद्या तिरुअनंतपुरममध्ये होणार 29 फिरत्या पशुवैद्यकीय युनिटचे आणि केंद्रीकृत कॉल सेंटरचे उद्घाटन


1962 या एकाच हेल्पलाईन क्रमांकाद्वारे केंद्रीकृत कॉल सेंटरच्या माध्यमातून या फिरत्या पशुवैद्यकीय युनिटचे होणार कार्यान्वयन

Posted On: 04 JAN 2023 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2023

 

केरळमधील पशुपालक शेतकऱ्यांच्या हितासाठी एक उल्लेखनीय कार्य म्हणून केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला उद्या, 5 जानेवारी 2023 रोजी तिरुअनंतपुरममध्ये 29 फिरत्या पशुवैद्यकीय युनिट्स आणि केंद्रीकृत कॉल सेंटरचे उद्घाटन करतील.

1962 या एकाच हेल्पलाईन क्रमांकाद्वारे केंद्रीकृत कॉल सेंटरच्या माध्यमातून या फिरत्या पशुवैद्यकीय युनिट चे कार्यान्वयन होणार आहे. या सेंटर मध्ये पशुपालक / प्राणी मालकांनी दूरध्वनी केल्यावर पशुवैद्यक आपत्कालीन स्वरूपाच्या आधारावर सर्व प्रकरणांना प्राधान्य देतील आणि शेतकऱ्यांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जवळच्या फिरत्या पशुवैद्यकीय युनिट ना संपर्क करतील.

दुर्गम भागातील शेतकरी/पशु मालकांना फिरत्या पशुवैद्यकीय युनिट द्वारे रोगनिदान उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, किरकोळ शस्त्रक्रिया हस्तक्षेप, दृकश्राव्य सहाय्य आणि विस्तार सेवा घरपोच मिळतील.

पशुवैद्यकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि देशातील दुर्गम भागात माहितीचा प्रसार करण्यासाठी ही फिरती पशुवैद्यकीय युनिट वन-स्टॉप केंद्र म्हणून काम करतील.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888602)