राष्ट्रपती कार्यालय

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 31 DEC 2022 6:27PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांना नवीन वर्ष 2023 च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की "सर्व नागरिक आणि परदेशस्थ भारतीयांना नवीन वर्षाच्या  मनःपूर्वक शुभेच्छा.

या नवीन वर्षाची पहाट आपल्या जीवनात नवा आनंद, नवीन उद्दिष्टै, नव्या प्रेरणा आणि यशोशिखरे घेऊन येवो.

यासमयी राष्ट्राची एकता, एकात्मता आणि सर्वांगीण विकास यासाठी स्वतःला पुनर्समर्पित करण्याचा निश्चय आपण करुया.

वर्ष 2023 आपले वैभवशाली राष्ट्र  आणि  नागरिकांसाठी  विकास तसेच समृद्धीदायी ठरो अशी  कामना करते.

राष्ट्रपतींचा संदेश संपूर्ण बघण्यासाठी येथे क्लिक करा

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887802) Visitor Counter : 143