पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील नियोजित कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2022 9:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यासाठी रवाना होणार होते, मात्र आता ते आपल्या पश्चिम बंगालमधील नियोजित कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवरून दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयाचा ट्विटर संदेश,
"पंतप्रधान @narendramodi पश्चिम बंगालमधील आजच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होतील. या कार्यक्रमांमध्ये दळणवळणाशी संबंधित काही महत्वाच्या प्रकल्पांचा प्रारंभ आणि राष्ट्रीय गंगा परिषदेसोबतची बैठक या कार्यक्रमांचा समावेश आहे."
आज सकाळी अहमदाबाद इथे पंतप्रधानांच्या आईचे निधन झाले.
***
G.Chippalkatti/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1887464)
आगंतुक पटल : 246
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam