रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेद्वारे सिमेन्स इंडिया कंपनीला 9000 एचपी इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटीव्ह (इंजिन) तयार करण्याचे कंत्राट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिल 2022 ला दाहोद इथल्या भारतीय रेल्वेच्या कारखान्याची पायाभरणी केली होती
या निर्णयामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या दोन्ही अभियांनांच्या पूर्ततेसाठी एक मोठी झेप घेतली जाईल
Posted On:
24 DEC 2022 1:28PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वेनं सिमेन्स इंडियाला, 9000 एचपी इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटीव्ह म्हणजे इंजिन तयार करण्यासाठीचे कंत्राट दिले आहे. दाहोदच्या रेल्वेच्या कारखान्यात 1200 उच्च अश्वशक्तिची (9000 एचपी) ही इलेक्ट्रिक रेल्वे इंजिन पुढच्या 11 वर्षांसाठी तयार केले जातील.
या अंतर्गत 1200 लोकोमोटिव्हचे उत्पादन आणि पुढची 35 वर्षे या लोकोमोटिव्हची देखभाल केली जाणार आहे. कर आणि किमतीतील फरक वगळता या कंत्राटाचे अंदाजे मूल्य 26000 कोटी (सुमारे 3.2 अब्ज डॉलर्स) इतके आहे.
ह्या कंत्राटाचे पत्र जारी झाल्यानंतर 30 दिवसांत, सिमेन्स इंडिया सोबत, एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या जातील. येत्या दोन वर्षात, नमूना इंजिन तयार करून दिले जातील. तसेच, या लोकोमोटीव्हचे उत्पादन करण्यासाठी, दोन वर्षात दाहोदचा कारखाना पूर्णपणे तयार केला जाईल. त्यासाठी, तंत्रज्ञान भागीदार म्हणून निवड करण्यात आलेली सिमेन्स कंपनी, दाहोद इथे, ही इंजिने तयार करेल आणि विशाखापट्टणम, रायपूर, खरगपूर आणि पुणे या चार ठिकाणी असलेल्या देखभाल आणि दुरुस्ती डेपो मध्ये पुढची 35 वर्षे त्यांची देखभाल करण्याचे कामही हीच कंपनी करेल, त्यासाठी रेल्वेचे मनुष्यबळ वापरले जाईल.
या उत्पादनाचे संपूर्ण स्वदेशीकरण सुनिश्चित झाल्यावर इथल्या सहाय्यक/पूरक उत्पादन युनिट्सचा विकास होईल आणि तो खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ चा उपक्रम ठरेल. या प्रकल्पामुळे दाहोद क्षेत्राचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल.
हे उच्च अश्वशक्तिचे इंजिन्स (9000 HP) भारतीय रेल्वेवरील मालवाहतुकीसाठी भविष्यातील कार्यशक्ती ठरतील. हे इंजिन प्रामुख्याने 4500 टन कंटेनर मालवाहू गाड्या 75 किमी प्रतितास या 200 ग्रेडियंटमध्ये एक मध्ये दुहेरी स्टॅक कॉन्फिगरेशनमध्ये नेण्यासाठी वापरण्यासाठी उपयुक्त ठरतील. या इंजिनामुळे अशा मालवाहू गाड्यांची सरासरी गती, विद्यमान 20-25 किमी प्रतितासांपासून सुमारे 50-60 किमी प्रतितास पर्यंत वाढणे अपेक्षित आहे.
मालवाहू रेल्वेच्या कार्यान्वयानात झालेली ही लक्षणीय सुधारणा, उत्पादकता आणि रेल्वेलाइन क्षमता देखील वाढवेल. अत्याधुनिक IGBT आधारित प्रोपल्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन पुनर्जीवन ब्रेकिंग तंत्रज्ञानामुळे ऊर्जावापरात बचत करणारेही ठरतील.
***
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886265)
Visitor Counter : 235