पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बिहारच्या मोतिहारी इथं वीटभट्टीवर झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख


प्रधानमंत्री मदत निधीतून पीडितांना सानुग्रह अनुदानाची घोषणा

Posted On: 24 DEC 2022 9:47AM by PIB Mumbai

 

बिहारच्या मोतिहारी इथं झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 

या अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर, जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान, प्रधानमंत्री मदत निधीतून जाहीर करण्यात आलं आहे.

पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे:

"मोतिहारी इथल्या वीटभट्टीत झालेल्या अपघातातील जीवितहानीचे वृत्त अतिशय दु:खद आहे. या अपघातातील पीडित कुटुंबाप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो.  जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो. प्रधानमंत्री मदतनिधीतून बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत तर, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे"

****

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1886249) Visitor Counter : 228