पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

जैवविविधता अधिवेशनाच्या COP15 मध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सादर केले राष्ट्रीय निवेदन

Posted On: 17 DEC 2022 9:20AM by PIB Mumbai

 

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कॅनडातील मॉन्ट्रियल येथे जैविक विविधता (CBD) परिषदेच्या (COP 15) पंधराव्या बैठकीत भारताचे राष्ट्रीय निवेदन केले. आपल्या निवेदनात भूपेंद्र यादव म्हणाले, " महामहिम राष्ट्रपती, बंधू आणि भगिनींनो,

जैवविविधतेसह सर्व जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी विश्वासार्ह कृती हीच शक्ती आणि आशावादाचा स्रोत आहे हे सत्य आपण सर्वजण जाणतोच. जागतिक लोकसंख्येच्या 17% लोक भारतात राहतात. असे असूनही केवळ 2.4% भूभाग आणि केवळ 4% जलस्रोत भारताकडे आहे. तरीही आपल्या प्रयत्नांतून आपण पुढे जात आहोत.

आपल्या वन्यजीवांच्या संख्येसह आपले जंगल आणि वृक्ष अच्छादन सातत्याने वाढत आहे. चित्ता, हा प्राणी भारतीय अधिवासात परत आणण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. भारताने घोषित केलेल्या सध्याच्या पंचाहत्तर रामसर स्थळांच्या (जैवविविधता संवर्धनासाठी निवडलेल्या पाणथळीच्या जागा) संख्या वाढीत देशाने मोठी झेप घेतली आहे. एक मोठा विकसनशील देश म्हणून आपले वन धोरण राबविणे आव्हानात्मक आहे; परंतु आपले वन सर्वेक्षण हे वन धोरणाच्या यशाची साक्ष देत आहेत.

'ऐची उद्दिष्टां'च्या (Aichi टार्गेट्स (जैवविविधतेसाठीच्या धोरणात्मक योजनेअंतर्गत निश्चित 20 जागतिक लक्ष्यांचा संच) अंमलबजावणीसाठी भारताचा ताळेबंद सक्रिय आणि भविष्यावर नजर ठेवून आहे; तसेच भारत आपली वचनबद्धता पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे.

त्याचप्रमाणे, आपली शेती, इतर विकसनशील देशांप्रमाणेच, कोट्यवधी लोकांचे जीवन, उपजीविका आणि संस्कृतीचा स्त्रोत आहे. असुरक्षित घटकांना आवश्यक अशा आधारांना अनुदान म्हणता येणार नाही आणि त्यांना निर्मूलनासाठी लक्ष्य केले जाऊ शकत नाही, परंतु ते तर्कसंगत केले जाऊ शकतात. सकारात्मक गुंतवणुकीतून जैवविविधतेला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचप्रमाणे, कीटकनाशके कमी करण्यासाठी संख्यात्मक जागतिक लक्ष्य अनावश्यक आहे. हा निर्णय घेण्याची जबाबदारी त्या त्या देशांवर सोडली पाहिजे.

आक्रमक एलियन प्रजातींना दूर ठेवण्यासाठी भारताने अनेक पावले उचलली आहेत; परंतु आवश्यक आधाररेखा आणि संबंधित वैज्ञानिक पुराव्याशिवाय संख्यात्मक लक्ष्य साध्य करणे शक्य नाही.

 

महामहिम,

जागतिक जैवविविधता आराखडा विज्ञान आणि समानतेच्या आधारावर तयार केले जाणे आवश्यक आहे आणि जैवविविधतेवरील अधिवेशनात प्रदान केल्याप्रमाणे त्यांच्या संसाधनांवर राष्ट्रांचा सार्वभौम अधिकार आहे. जर हवामान जैवविविधतेशी जोडलेले असेल, तर जैवविविधतेला समानतेचे तत्त्व आणि समान, परंतु भिन्न जबाबदाऱ्या तसेच संबंधित क्षमता समान रीतीने लागू होणे आवश्यक आहे.

विकसित देशांच्या ऐतिहासिक असमान आणि अयोग्य कार्बन (GHG) उत्सर्जनामुळे निसर्गावरच ताण पडत असताना, जागतिक तापमानवाढ आणि इतर पर्यावरणीय आव्हानांवर जोवर विकसित देश त्यांच्या ऐतिहासिक आणि वर्तमान जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ठोस कृती करणार नाहीत तोवर निसर्ग-आधारित उपाय प्रभावी ठरणार नाहीत. निसर्ग स्वतः संरक्षित नसेल तर तो स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. निसर्ग हा जागतिक तापमान वाढीचा बळी आहे; त्याची संरक्षणात्मक वैशिष्ट्ये अनियंत्रित तापमान वाढीविरूद्ध काही करू शकतात.

आपण केवळ संवर्धन, जतन व पुनर्रचना करू शकत नाही. आपण शाश्वत वापरालाही प्रोत्साहन दिले पाहिजे; याच संदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील एकता नगर येथे संयुक्त राष्ट्र सचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत LiFE - जीवनशैलीसाठी पर्यावरण केंद्रीत लोक चळवळ सुरू केली.

 

महामहिम,

अंमलबजावणीच्या साधनांची तरतूद आपल्या महत्त्वाकांक्षेशी जुळणारी असली पाहिजे. सहस्त्र विकास लक्ष्य (MDG) ची 8 उद्दिष्टे होती, शाश्वत विकास लक्ष्य (SDG)ची 17 उद्दिष्टे होती, 'ऐची' (Aichi) जैवविविधता लक्ष्ये 20 आणि जागतिक जैवविविधता आराखडा (GBF)ची 23 उद्दिष्टे असू शकतील. या उद्दिष्टांद्वारे वाढलेल्या अपेक्षांमुळे, विशेषत: सार्वजनिक वित्त मार्फत, अंमलबजावणीसाठी जुळणारे साधन आवश्यक आहे. आपला निधीचा एकमेव स्रोत जागतिक पर्यावरण सुविधा आहे जी अनेक अधिवेशनांची पूर्तता करते.

मानवजातीसाठी जैवविविधतेचे मूल्य सांस्कृतिक आणि सामाजिक यासोबतच आर्थिक परिमाणात देखील आहे. संवर्धन, संरक्षण आणि पुनर्संचयन करण्याच्या प्रयत्नांबरोबरच जैवविविधतेला चालना देण्यासाठी शाश्वत वापर आणि उपलब्धता आणि लाभाचे सामायिकरण महत्त्वाचे आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः माहिती तंत्रज्ञान उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला मदत करू शकतात. त्यामुळे डिजिटल सिक्वेन्सिंगची माहिती न्याय्य पद्धतीने उपलब्धता आणि लाभ सामायिकरणाशी जोडलेली असणे आवश्यक आहे.

 

महामहिम,

भारत आपल्या पूर्वजांनी व परंपरांनी आपल्याला प्रदान केलेल्या आपल्या नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करेल अशा फलदायी चर्चांची अपेक्षा करतो. आपण केवळ पृथ्वीचे संरक्षक मात्र आहोत आणि पृथ्वी मातेची समृद्ध जैवविविधता अधिक समृद्ध करणे, तिचे मूळ वैभव पुनर्संचयित करणे आणि मानवजातीच्या, निसर्गाच्या आणि सर्व जीवसृष्टीच्या फायद्यासाठी ते पुढील पिढीकडे सुपूर्द करणे हे कर्तव्य आपल्याला बंधनकारक आहे.

मी पुन:पुन्हा सांगतो, की आज आपल्याला गरज आहे ती बुद्धी पूर्वक आणि जाणीव पूर्वक वापराची, निर्बुद्ध आणि विनाशकारी उपभोगाची नव्हे. याच संदर्भात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन लाइफ सुरू केले आहे जे पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक जीवनशैलीसाठीची एक व्यापक चळवळ आहे. या मिशनचा स्वीकारून, CBDची मूलभूत तत्त्वे आचरणने आणि आत्म्याने अंमलात आणून आपण न्याय्य आणि शाश्वत जगाकडे वाटचाल करूया. हीच भावना भारताच्या G20 अध्यक्षीय कारकिर्दीच्या लोगोमध्ये खऱ्या अर्थाने टिपली गेली आहे जी एक जग, एक कुटुंब' असल्याचे सांगते.

॥वसुधैव कुटुम्बकम्॥

जय हिंद !!

***

S.Pophale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1884363) Visitor Counter : 571