पंतप्रधान कार्यालय
प्रमुखस्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
अक्षरधाम मंदिरात पूजा अर्चना करत घेतले दर्शन
''भारताची आध्यात्मिक परंपरा आणि विचार यांचे चिरंतन आणि वैश्विक महत्त्व आहे"
"वेदांपासून विवेकानंदांपर्यंतचा प्रवास आज या शताब्दी सोहळ्यात पाहता येईल"
"सेवा हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय असावे"
"उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वामीजी महाराजांकडून लेखणी घेण्याची परंपरा राजकोट ते काशीपर्यंत कायम आहे"
“आपल्या संतपरंपरा केवळ संस्कृती, पंथ, आचार आणि विचारधारेच्या प्रसारापुरत्या मर्यादित नसून भारतातील संतांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भावना जागृत करून जगाला एकत्र बांधले आहे.
प्रमुखस्वामी महाराजांचा देवभक्ती आणि देशभक्तीवर विश्वास होता"
‘राजसी’ किंवा ‘तामसिक’ नाही, ‘सात्विक’ राहूनच वाटचाल करावी लागते
Posted On:
14 DEC 2022 9:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये प्रमुखस्वामी महाराज शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केले.बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे जागतिक मुख्यालय असलेल्या शाहीबाग येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराने आयोजित केलेल्या ‘प्रमुखस्वामी महाराज शताब्दी महोत्सवा’ अंतर्गत वर्षभर चाललेल्या जागतिक सोहळ्याचा समारोप झाला आणि या 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत अहमदाबादमध्ये आयोजित सोहळ्यात दैनंदिन कार्यक्रम, संकल्पनाआधारित प्रदर्शने आणि विचारांना उद्युक्त करणारी दालने असतील.
या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी प्रमुखस्वामी महाराजांचा जयजयकार करून आणि महत्त्वाच्या प्रसंगी सर्वांचे स्वागत करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. देवत्वाची उपस्थिती आणि संकल्पांची भव्यता आणि वारशाचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आवारात भारताचा प्रत्येक रंग पाहायला मिळतो, असे ते म्हणाले.
या भव्य परंपरेसाठी त्यांच्या कल्पनाशक्तीला महत्त्व देण्याच्या दृष्टीने प्रत्येक संतांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.हा भव्य कार्यक्रम केवळ जगालाच आकर्षित करणार नाही तर येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल आणि प्रभावित करेल, असे ते म्हणाले. “अशा स्वरूपाच्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचा विचार केल्याबद्दल मला संत आणि सिद्धपुरुषांची प्रशंसा करायची आहे”, असे त्यांनी सांगितले. पूज्य प्रमुखस्वामी महाराज आपल्या पित्यासमान असल्याचे सांगत या कार्यक्रमामध्ये लोक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येतील, असे ते म्हणाले. भारताच्या आध्यात्मिक परंपरा आणि विचारांचे चिरंतन आणि सार्वत्रिक महत्त्व सिद्ध करणारा शताब्दी सोहळा संयुक्त राष्ट्रांनीही साजरा केला, असेही त्यांनी नमूद केले. स्वामी महाराजांसह भारतातील थोर संतांनी प्रस्थापित केलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेला अधोरेखित करून त्याचा आणखी पुढे प्रचार करून वेद ते विवेकानंदांपर्यंतचा प्रवास आज या शताब्दी महोत्सवात पाहता येईल, असे पंतप्रधान म्हणाले. "इथे भारतातील समृद्ध संत परंपरांचे साक्षीदार होता येईल ", असे ते म्हणाले. आपल्या संत परंपरा या केवळ संस्कृती, पंथ, आचार आणि विचारसरणीच्या प्रचारापुरत्या मर्यादित नसून भारतातील संतांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला जागृत करून जगाला एकत्र बांधले आहे,असे पंतप्रधानांनी नमूद केले. .
स्वामीजींसोबतच्या सहवासाचे स्मरण करून पंतप्रधान जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. “मी लहानपणापासूनच प.पू.प्रमुखस्वामी महाराजांच्या आदर्शांकडे आकर्षित झालो, असे ते म्हणाले. आयुष्यात कधीतरी त्यांना भेटण्याची संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते. 1981 मध्ये सत्संगाच्या वेळी माझी त्यांची भेट झाली असावी, तेव्हा केवळ सेवेबद्दलच बोलले. त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर कोरला गेला आहे . जीवनाचे सर्वोच्च ध्येय सेवा हेच असावे हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. ", असे त्यांनी सांगितले. स्वामीजीं त्यांचा संदेश स्वीकारणाऱ्याच्या क्षमतेनुसार ते तो तयार करायचे; हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भव्यता होती, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. सर्वजण त्यांना आध्यात्मिक व्यक्ती म्हणून ओळखतात पण खर्या अर्थाने ते समाजसुधारकही होते, असे पंतप्रधान म्हणाले. आधुनिक संधींबद्दल स्वामीजींचे सूक्ष्म ज्ञानाबद्दलचे आकलन आणि व्यक्तीच्या समस्यांची काळजी घेण्याच्या सामर्थ्याचा त्यांचा नैसर्गिक संवाद पंतप्रधानांनी अधोरेखित केला.त्यांचा मुख्य भर समाजाच्या कल्याणावर होता, यावर पंतप्रधानांनी भर दिला. “प.पू.प्रमुखस्वामी महाराज हे सुधारणावादी होते. ते विशेष होते कारण त्यांनी प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले पाहिले आणि त्यांना त्यांच्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मदत केली. मोरबी येथील मच्छू धरण दुर्घटनेदरम्यानचे प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही,” असे पंतप्रधान म्हणाले. पूज्य स्वामीजींना भेटायला गेल्यावरच्या त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे पंतप्रधानांनी स्मरण केले
2002 मध्ये राजकोटमधून उमेदवार असतानाच्या आठवणींना उजाळा देताना निवडणूक प्रचारादरम्यान आपल्याला दोन संतांकडून एक पेन मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या पेनचा वापर करून नामनिर्देशनपत्रावर स्वाक्षरी करण्याची विनंती प्रमुखस्वामी महाराजांनी आपल्याला केली होती. “तेथून काशीच्या निवडणुकीपर्यंत ही प्रथा सुरूच आहे”, अशी टिप्पणी त्यांनी केली. वडील आणि मुलाच्या नात्याशी साधर्म्य साधत पंतप्रधानांनी कच्छमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असताना प्रमुखस्वामी महाराजांनी त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली होती, त्या काळाची आठवण करून दिली. गेल्या 40 वर्षात पूज्य स्वामींकडून दरवर्षी न चुकता कुर्ता पायजमा कापड मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली. हे आध्यात्मिक नाते आहे, पिता-पुत्राचे नाते आहे असे भावनिक झालेले पंतप्रधान म्हणाले. पूज्य स्वामीजी देशसेवेतील त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले.
1991 मध्ये डॉ. एम.एम. जोशी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या प्रतिकूल एकता यात्रेत, जम्मूला पोहोचल्यानंतर त्यांना बोलावून घेणारे स्वामी महाराज हे पहिले व्यक्ती होते, असे पंतप्रधानांनी प्रमुखस्वामी महाराज यांच्याशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकताना सांगितले. “ज्या क्षणी मी लाल चौकातील ध्वजारोहण करून जम्मूला पोहोचलो तेंव्हा माझ्या खुशालीबाबत विचारणा करणारा पहिला फोन आला तो प्रमुखस्वामी महाराजांचा होता,” असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी अक्षरधाम मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याच्या काळोख्या काळाची आठवण करून दिली आणि अशा अतिक्षुब्ध काळात शांतता राखण्याबद्दल त्यांच्या प्रमुखस्वामी महाराज यांच्याशी झालेल्या संभाषणाची आठवण केली. ही शांतता केवळ पूज्य स्वामीजींच्या आंतरिक आध्यात्मिक शक्तीमुळेच शक्य झाली, असे पंतप्रधान म्हणाले.
यमुनेच्या तीरावर अक्षरधाम बांधण्याच्या प्रमुखस्वामी महाराजांच्या इच्छेविषयी माहिती देताना पंतप्रधानांनी महंत स्वामी महाराजांच्या दूरदृष्टीवर प्रकाश टाकला. महंत स्वामी हे तत्कालीन प्रमुखस्वामी महाराजांचे शिष्य होते. लोक महंत स्वामी महाराजांना गुरू म्हणून पाहत असले तरीही, प्रमुखस्वामी महाराजांप्रति शिष्य या नात्याने त्यांच्या समर्पणाची जाणीव आपल्याला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "यमुनेच्या काठावर अक्षरधाम मंदिर बांधले गेले हे त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणाचा परिणाम आहे. अक्षरधाम मंदिराला दरवर्षी भेट देणारे लाखो लोक भारतीय संस्कृती आणि परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करतात.” असे त्यांनी सांगितले. “जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला प्रमुखस्वामी महाराजांच्या दूरदृष्टीचे फलित दिसेल. आपली मंदिरे आधुनिक आणि आपल्या परंपरांना अधोरेखित करणारी आहेत यावर त्यांनी भर दिला. त्यांच्यासारख्या महान व्यक्तींनी आणि रामकृष्ण मिशनने संत परंपरेची नव्याने व्याख्या केली. आध्यात्मिक उन्नतीच्या पलीकडे जाऊन सेवेची परंपरा निर्माण करण्यात पूज्य स्वामीजींचा मोठा वाटा आहे.” असे पंतप्रधानांनी सांगितले.
संन्यासा व्यतिरिक्त, एक संत देखील सक्षम आणि पारंगत असावा हे स्वामीजींनी हे सुनिश्चित केल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्वामीजींनी सर्वांगीण अध्यात्मिक प्रशिक्षणासाठी एक संस्थात्मक यंत्रणा स्थापन केल्याचा फायदा पुढील अनेक पिढ्यांसाठी देशाला होईल,असेही पंतप्रधान म्हणाले. "देवभक्ती' आणि 'देशभक्ती', देशभक्ती यात त्यांनी कधीही भेद केला नाही", याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जे ‘देवभक्ती’साठी जगतात आणि जे ‘देशभक्ती’साठी जगतात त्यांना आपण ‘सत्संगी’ मानतो, असेही ते म्हणाले. “आपल्या संतांनी संकुचित पंथांच्या पलीकडे जाऊन वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेला बळकट करण्याचे आणि जगाला एकत्र आणण्याचे काम केले.” असे पंतप्रधान म्हणाले.
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी आपल्या विवेकाच्या प्रवासाविषयी माहिती दिली आणि ते म्हणाले की ते नेहमीच अशा संत आणि प्रगत परंपरांशी जोडलेले आहेत. “आजच्या सारख्या दडपशाहीच्या आणि सूडबुद्धीच्या जगात, मी भाग्यवान आहे की सद्गुणी वातावरण निर्माण करणार्या प्रमुखस्वामी महाराज आणि महंत स्वामी महाराजांसारखे संत माझ्या अवती भोवती आहेत. जणू एखाद्या भल्यामोठ्या वटवृक्षाच्या सावलीत विसाव्याला बसलेल्या व्यक्तीप्रमाणे. ‘राजसी’ किंवा ‘तामसी’ बनून नव्हे, तर ‘सात्विक’ राहूनच व्यक्तीला वाटचाल सुरू ठेवावी लागेल,’ असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, परमपूज्य महंत स्वामी महाराज आणि पूज्य ईश्वरचरण स्वामी सोहोळ्यास उपस्थित होते.
पार्श्वभूमी
परमपूज्य प्रमुखस्वामी महाराज हे मार्गदर्शक आणि गुरु होते ज्यांनी संपूर्ण भारत आणि जगभरातील असंख्य लोकांना मार्ग दाखवला. एक महान आध्यात्मिक नेता म्हणून त्यांचा सर्वत्र आदर आणि प्रशंसा करण्यात आली. त्यांचे जीवन अध्यात्म आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित होते. बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख म्हणून, त्यांनी लाखो लोकांना दिलासा आणि सेवा प्रदान करून असंख्य सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमांना प्रेरणा दिली.
प.पू.प्रमुखस्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षात जगभरातील लोक त्यांचे जीवन आणि कार्य साजरे करत आहेत. बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे जागतिक मुख्यालय असलेल्या शाहीबाग येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिराने आयोजित केलेल्या ‘प्रमुखस्वामी महाराज शताब्दी महोत्सवा’मध्ये वर्षभर चाललेल्या जगभरातील उत्सवाचा समारोप झाला आहे. अहमदाबादमध्ये 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत महिनाभर चालणारा हा सोहळा, दैनंदिन कार्यक्रम, संकल्पनांवर आधारित प्रदर्शने आणि विचार करायला लावणारे मंडप यांचा समावेश आहे.
बीएपीएस स्वामीनारायण संस्थेची स्थापना शास्त्रीजी महाराजांनी 1907 मध्ये केली. वेदांच्या शिकवणींवर आधारित आणि व्यावहारिक अध्यात्माच्या आधारस्तंभांवर आधारित, बीएपीएस आजच्या आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी दूरदूरपर्यंत पोहोचते. विश्वास, एकता आणि निःस्वार्थ सेवा या मूल्यांचे जतन करणे आणि जीवनाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करणे हे BAPS चे उद्दिष्ट आहे. हे जागतिक व्याप्ती असलेल्या प्रयत्नांद्वारे मानवतावादी उपक्रम आयोजित करत असते.
***
ShaileshP/Sonal/Shradhaa/Vasanti/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1883648)
Visitor Counter : 247
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam