कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मसुरीच्या नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (एनसीजीजी) येथे मालदीव आणि बांगलादेशच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी दोन आठवड्यांच्या क्षमता बांधणी कार्यक्रमांचे उद्घाटन


नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुशासनाच्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत : एनसीजीजीचे महासंचालक भरत लाल

Posted On: 13 DEC 2022 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 डिसेंबर 2022

 

नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (एनसीजीजी), मसूरी येथे मालदीव आणि बांगलादेशच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी दोन आठवड्यांच्या क्षमता बांधणी कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. या दोन कार्यक्रमांमध्ये मालदीवमधील 27 आणि बांगलादेशातील 39 प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले आहेत.

   

या कार्यक्रमाची संकल्पना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वसुधैव कुटुंबकम' आणि 'नेबरहुड फर्स्ट' या धोरणाच्या अनुरूप आहे. शेजारी देशांना प्रशासनातील आगामी आव्हानांना सामोरे जाता यावे यासाठी त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी भारत मदत करत आहे आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी नागरी सेवेची ग्वाही देत आहे.

नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सचे महासंचालक भरत लाल हे या संयुक्त उद्घाटन सत्राचे अध्यक्ष होते. अधिकार्‍यांना संबोधित करताना त्यांनी प्रभावी सार्वजनिक सेवा प्रदान करण्यावर भर दिला.   प्रत्येक नागरिकाला समान वागणूक मिळावी  आणि त्यांना दर्जेदार सार्वजनिक सेवा मिळावी, यासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यात  प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका भरत लाल यांनी विशद केली.   जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी सुशासन पद्धती अवलंबण्याचे आवाहन त्यांनी केले.

            

नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सची स्थापना भारत सरकारने 2014 मध्ये  केली. सुशासन, धोरणात्मक सुधारणा, प्रशिक्षण आणि देशातील तसेच इतर विकसनशील देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीवर कार्य करण्यासाठी ही देशातील सर्वोच्च संस्था स्थापन करण्यात आली. आतापर्यंत बांगलादेश, केनिया, टांझानिया, ट्युनिशिया, सेशेल्स, गांबिया, मालदीव, श्रीलंका, अफगाणिस्तान, लाओस, व्हिएतनाम, भूतान, म्यानमार आणि कंबोडिया या 15 देशांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1883070) Visitor Counter : 238