राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या, 97 व्या एकत्रित प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा सांगता समारंभ


‘गोपनीयता’,‘क्षमता’आणि शिस्तबद्ध आचरण', ही नागरी सेवकांची आभूषणे आहेत : राष्ट्रपती मुर्मू

Posted On: 09 DEC 2022 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 डिसेंबर, 2022) मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या(लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ,LBSNAA) 97 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले आणि प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या,की हे भाषण करत असताना सरदार वल्लभभाई पटेल यांचे शब्द त्यांच्या कानात रुंजी घालत आहेत. एप्रिल 1947 मध्ये सरदार पटेल आयएएस प्रशिक्षणार्थींच्या तुकडीला भेटले होते .त्या वेळी ते म्हणाले होते, "प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने (नागरी सेवकाला) तो किंवा ती कोणत्याही जबाबदारीच्या पदावर असली तरी, सर्वोत्तमच काम करेल, अशी अपेक्षा आम्ही ठेवली पाहिजे आणि ती ठेवण्याचा आम्हाला अधिकारही आहे". राष्ट्रपती म्हणाल्या, की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, असे आज आपण अभिमानाने म्हणून शकतो.राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात पुढे नमूद केले, की या फाउंडेशन कोर्सचा प्रमुख मंत्र " मी नव्हे,आम्ही", हा आहे". इथे प्रशिक्षण घेणारे अधिकारी सामूहिक भावनेने देशाला पुढे नेण्याची जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  यातील अनेकजण येत्या 10-15 वर्षांत आपल्या विशाल देशातील विविध भागांचा कारभार चालवतील आणि जनतेशी जोडून घेतील, असेही त्या म्हणाल्या. हे सर्व अधिकारी त्यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी ठोस कार्य करु शकतील, असेही त्या पुढे म्हणाल्या.

'शीलम परम भूषणम्' म्हणजेच 'चारीत्र्य हाच सर्वोच्च गुण आहे' या अकादमीच्या ब्रीदवाक्याचा संदर्भ देत राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की या अकादमीतील (LBSNAA) प्रशिक्षणाची पद्धत कर्मयोगाच्या तत्त्वावर आधारित आहे, ज्यामध्ये चारित्र्याला खूप महत्त्व आहे. त्यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशील राहण्याचा सल्ला दिला.  त्या म्हणाल्या की, 'गोपनीयता’, ‘क्षमता’ आणि शिस्तबद्ध आचरण', ही सरकारी सेवकांची आभूषणे आहेत.हे गुण त्यांना त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत आत्मविश्वास बहाल करतील.

प्रशिक्षणादरम्यान अधिकारी प्रशिक्षणार्थी जी मूल्ये शिकतील, ती केवळ सैद्धांतिक व्याप्तीपुरती मर्यादित नसावीत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

समाजाच्या हिताचे कोणतेही काम सर्व संबंधितांना सोबत घेतल्यावरच कार्यक्षमतेने पूर्ण होऊ शकते, असे राष्ट्रपतींनी सांगितले. ज्यावेळी अधिकारी समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतील, तेव्हा ते त्यांचे ध्येय साध्य करण्यात नक्कीच यशस्वी होतील, असे ही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

 

 

R.Aghor/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1882081) Visitor Counter : 131