भारतीय निवडणूक आयोग

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांची भारतीय निवडणूक आयोगाला भेट

Posted On: 06 DEC 2022 3:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2022

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्या नेतृत्वाखालील जर्मनीच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्लीतील निर्वचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांची भेट घेतली.

जर्मन शिष्टमंडळाने  ईव्हीएम  व्हीव्हीपॅट यंत्रांच्या वापरामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या कठोर प्रोटोकॉल आणि सुरक्षा वैशिष्ट्यांचे निरीक्षणही केले.

भारताच्या परंपरा आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये लोकशाहीची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यावेळी म्हणाले. भारतीय निवडणूक प्रक्रियेचा प्रचंड आवाका सांगून मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक,सर्वांसाठी सुलभप्रवेश आणि सर्वांचा सहभाग असलेली  मजबूत निवडणूक प्रक्रिया पार पडण्याच्या हेतूने  भारतीय निवडणूक आयोग  950 दशलक्ष मतदारांसाठी 1.1 दशलक्ष मतदान केंद्रांवर 11 दशलक्ष मतदान कर्मचार्‍यांनाच्या नियुक्तीसह आयोजित करत असलेल्या मतदान प्रक्रियेविषयी त्यांनी जर्मन शिष्टमंडळाला सविस्तर माहिती दिली.

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आयोगाशी संवाद साधताना, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात विविध भौगोलिक, सांस्कृतिक प्रदेश आणि मतदारांची विशाल संख्या अशी आव्हाने असताना देखील भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक व्यवस्थापनाच्या व्यापक क्षमतेबद्दल कौतुक केले. भारतीय निवडणूक आयोगाने जर्मनीच्या शिष्टमंडळासाठी आयोजित केलेल्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट कार्यप्रणालीच्या प्रात्यक्षिकात त्यांनी स्वतः ईव्हीएम  यंत्रावर मतदान केले. त्यांच्याबरोबर आलेल्या जर्मनीच्या खासदारांनी देखील  स्वतंत्रपणे काम करण्यास सक्षम अशा ईव्हीएमच्या मजबूत सुरक्षा वैशिष्ट्यांसह या यंत्राची हाताळणी, हालचाल, स्टोअरेज, ऑपरेशन्स यांचे निरीक्षण केले तसेच ईव्हीएमचा समावेश असलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांच्या सहभागासाठीच्या प्रक्रियेवरील कठोर प्रशासकीय प्रोटोकॉलचे बारकाईने निरीक्षण केले.

यावेळी जर्मन परराष्ट्र कार्यालय, नवी दिल्लीतील जर्मन दूतावास आणि भारतीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

R.Aghor/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881143) Visitor Counter : 180