आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

माता मृत्यू गुणोत्तरात लक्षणीय घट, 2014-16 मध्ये लाखात 130 वरून 2018-20 मध्ये लाखात 97: डॉ मनसुख मांडवीय


माता मृत्यू संबंधीचे राष्ट्रीय आरोग्य धोरण लक्ष्य भारताने गाठले आहे

माता मृत्यू संबंधी शाश्वत विकास लक्ष्य 8 राज्यांनी गाठले आहे

Posted On: 30 NOV 2022 4:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2022

देशात माता मृत्यू गुणोत्तरात घट झाल्याने एक मैलाचा दगड पार करण्यात आला आहे. या कामगिरीसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी देशवासियांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, बालमृत्यू गुणोत्तरात लक्षणीय घट, 2014-16 मध्ये लाखात 130 वरून 2018-20 मध्ये लाखात 97. पंतप्रधान @NarendraModi जी यांनी आरोग्य क्षेत्रात घेतलेल्या विविध पुढाकारांमुळे सरकार उत्तम मातृ आणि प्रजनन सेवा देऊ शकत आहे, ज्यामुळे माता मृत्यू गुणोत्तर कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे.

भारताचे महानिबंधक यांनी जरी केलेल्या विशेष बातमीपत्रानुसार, देशातील माता मृत्यू गुणोत्तरात 6 अंकांची महत्त्वाची सुधारणा झाली आहे आणि आता हे गुणोत्तर एक लाख जिवंत अर्भकांच्या जन्मांमध्ये  97 इतके आहे. माता मृत्यू म्हणजे, एखाद्या ठराविक कालखंडात प्रत्येक 100,000 जिवंत अर्भके जन्माला येताना झालेले मातांचे मृत्यू.

नमुना नोंदणी व्यवस्थेतून प्राप्त झालेल्या आकडेवारी नुसार, देशात माता मृत्यू गुणोत्तरात सातत्याने घट होत आहे. 2014-2016 मध्ये 130, 2015-17 मध्ये 122, 2016-18 मध्ये 113, 2017-19 मध्ये 103 आणि 2018-20 97 ही सुधारणा खाली दर्शविण्यात आली आहे.

भारताने, हे यश साध्य करत माता मृत्यू दर प्रति लाख जन्म/100 हे राष्ट्रीय आरोग्य धोरणा(NHP)चे उद्दिष्टही साध्य केले आहे. तसेच, 2030 पर्यंत, ही संख्या प्रति लाखांमागे/70 पर्यंत कमी करण्याच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीकडेही योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे निदर्शक आहे.

ज्या राज्यांनी, शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात लक्षणीय प्रगती केली आहेत्यांची संख्याही आता पूर्वीच्या सहा राज्यांवरुन आठ राज्यांपर्यंत वाढली आहे. यात केरळ (19) सर्वात आघाडीवर असून, त्या खालोखाल महाराष्ट्र (33), त्यानंतर तेलंगणा (43) आणि आंध्र प्रदेश (45), त्यानंतर तामिळनाडू (54), झारखंड (56), गुजरात (57) आणि शेवटी कर्नाटक (69) असे प्रमाण आहे.

माता मृत्यू गुणोत्तराचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारताने केलेले परिश्रम, भारताचे माता मृत्यू 70 (प्रत्येकी एक लाखामागे) पेक्षा कमी करण्याचे शाश्वत विकास उद्दिष्ट 2030 या नियोजित कालमर्यादेपूर्वीच पूर्ण करता येईल आणि, भारत मातांची योग्य ती काळजी घेणारा देश आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यात मदत करेल, असे सुचिन्ह दर्शवणारे आहेत.

 

 

 

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879981) Visitor Counter : 281