राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था ,कुरुक्षेत्रच्या 18 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित


समाधान देणारे आणि जीवन सार्थ ठरेल असे करियर निवडण्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Posted On: 29 NOV 2022 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज (29 नोव्हेंबर, 2022)  राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी ) कुरुक्षेत्रच्या 18 व्या दीक्षांत समारंभात उपस्थित राहिल्या.

आज संपूर्ण जगात वेगाने बदल होत आहेत. तंत्रज्ञान  क्रांतीमुळे नोकऱ्यांचे स्वरूप तसेच लोकांच्या मूलभूत गरजाही बदलत आहेत.हे बदल अभियांत्रिकीच्या सध्याच्या पद्धतींनाही आव्हान देत आहेत.तंत्रज्ञानातील बदलामुळे होत असलेले परिवर्तन पाहता,एनआयटी कुरुक्षेत्रसह आपल्या  तंत्रज्ञान  संस्थांनी  'भविष्यासाठी सज्ज' होणे  खूप महत्वाचे आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

भारताच्या कृषी  विकासात  हरयाणा आणि पंजाब या प्रदेशांनी अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारतातील सामान्य नागरिक तंत्रज्ञानस्नेही  आहे हे महामारीच्या काळात सिद्ध झाले आहे. तंत्रज्ञान हे समाजाच्या भल्यासाठी असेल तर त्याला जनतेचे पूर्ण सहकार्य मिळते.डिजिटल पेमेंटचे यश हे त्याचेच  उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.

 तंत्रज्ञान हे केवळ विज्ञान आणि अभियांत्रिकीचे उप-उत्पादन नाही तर त्याला सामाजिक आणि राजकीय संदर्भ देखील आहेत.‘सामाजिक न्यायासाठी तंत्रज्ञान’ हा विचार घेऊन आपण सगळ्यांनी पुढे जायचे आहे.यामध्ये वंचित वर्ग मागे राहू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.भेदभाव रहित समाज घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 



(Release ID: 1879873) Visitor Counter : 163