माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) फौदा एस 4 या मालिकेचा प्रीमियर झळकणार
गोवा/मुंबई, 20 नोव्हेंबर 2022
यावर्षीच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) फौदा एस 4 या मालिकेचा प्रीमियर झळकणार आहे. या मालिकेचे निर्माते आणि कार्यकारी निर्माते लियोरराझ आणि अॅवी इस्साचेरॉफ हे मालिकेच्या पहिल्या भागासह इफ्फीमध्ये आगमन करणार आहेत.
जागतिक स्तरावर ही मालिका नेटफ्लिक्स या मंचावर 2023 पासून सुरु होणार आहे. “रविवार 27 सप्टेंबर रोजी इफ्फी मध्ये भव्य तारांकित कार्यक्रमात या मालिकेचा पहिला भाग सादर केला जाईल.”
मालिकेचे निर्माते आणि कार्यकारी निर्माते लियोर राझ आणि अॅवी इस्साचेरॉफ म्हणाले, “फौदा एस 4 च्या आशियातील प्रीमियर साठी भारतात येताना आम्ही फार उत्साहित झालो होतो. भारतातील चाहत्यांमध्ये ही मालिका ज्या सहजपणे प्रतिध्वनित झाली ते अविश्वसनीय आहे आणि या मालिकेच्या गेल्या चार मोसमांना रसिकांनी जे प्रेम आणि पाठींबा दिला त्याचे आम्हाला कौतुक आहे. आता मोसम 4 ला मिळणाऱ्या प्रतिसादाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहतो आहोत.”
या उपक्रमाची प्रशंसा करत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “कलात्मक प्रयत्न यशस्वी करण्यासाठी कोणतेही गुपित नसते. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगाच्या सर्व भागांमधील, वंशांच्या आणि संस्कृतींच्या विविध भाषांमधील अद्वितीय कथा गौरविल्या जातात आणि साजऱ्या केल्या जातात. या महोत्सवात आता ओटीटी मंच प्रीमियर सादरीकरणासाठी आणि त्यांच्या सामग्रीचे दर्शन घडविण्यासाठी पुढे आल्यानंतर ताज्या कथा, सृजनशील कल्पना आणि नवे दृष्टीकोन जगासमोर आणण्याचे आमचे प्रयत्न सफल झाले आहेत. इस्रायल देशाने आपल्याशी या संदर्भात अत्यंत प्रभावी दृक्श्राव्य करार केल्यामुळे, आता त्या प्रदेशातील सिनेक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर सुप्रसिध्द व्यक्तींचे यावर्षी 53 व्या इफ्फीसाठी यजमानपद भूषवताना आम्हाला फार आनंद होतो आहे.”
फौदा एस 4 मध्ये चित्रपटाची कथा इस्रायल देशाच्या सीमेपार जाताना दाखवली आहे. मालिकेतील डोरॉन (लियोर राझ) हे पात्र त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक मोहिमे दरम्यान खंड पार करुन एका संकटाचा माग काढते.
जगातील ज्या 20 देशांमध्ये नेटफ्लिक्स मंचाचे दर्शक अधिक प्रमाणात इस्रायल देशातील मालिका पाहणे जास्त पसंत करतात त्यापैकी भारत हा एक देश आहे. इस्रायलमधील कथा जागतिक पातळीवर लोकप्रिय आहेत आणि फौदा (एस1-एस3) चे 90 टक्क्यांहून अधिक दर्शक इस्रायलच्या बाहेरचे आहेत.
यावेळी “जागतिक मनोरंजनाच्या युगातील कथाकथन” या विषयावर होणाऱ्या चर्चेत लियोर राझ आणि अॅवी इस्साचेरॉफ यांच्यासह नेटफ्लिक्स वरील मोनिका,ओ माय डार्लिंग! या चित्रपटातील अभिनेता राजकुमार राव तसेच कंटेंट नेटफ्लिक्सच्या भारतातील उपाध्यक्ष मोनिका शेरगिल हे सहभागी होतील.
फौदाला भारतात मिळालेले यश पाहता नेटफ्लिक्स मंच कशा प्रकारे स्थानिक कथांना जागतिक प्रेक्षक मिळवून देतो हे अधिक ठळकपणे दिसून येते आहे. नेटफ्लिक्स मंचाच्या खाकी, द बिहार चॅप्टर, क्वाला आणि ग्विलेर्मो डेल टोरो यांचा पिनोशियो या चित्रपटांचे देखील प्रीमियर यंदाच्या इफ्फीमध्ये होणार आहेत.
नेटफ्लिक्स विषयी थोडेसे
नेटफ्लिक्स हा जगातील आघाडीचा मनोरंजन सेवा मंच असून जगातील 190 देशांमध्ये 223 दशलक्ष लोकांनी नेटफ्लिक्सचे सशुल्क सदस्यत्व घेतले आहे. या मंचावर अनेक शैली आणि भाषांतील विस्तृत वैविध्य असलेल्या दूरचित्रवाणी मालिका, माहितीपट, फिचर फिल्म्स आणि मोबाईल गेम्स उपलब्ध आहेत. दर्शकांना हवे तेव्हा या इंटरअॅक्टीव्ह मंचावर खेळता येते, मध्येच थांबता येते आणि त्या क्षणापासून पुन्हा पाहणे सुरु करता येते तसेच त्यांना त्यांचे सदस्यत्व प्लॅन कोणत्याही वेळी बदलता येतात.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877506)
Visitor Counter : 297