पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये नादप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण
Posted On:
11 NOV 2022 3:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये नादप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून तसेच पुतळ्यावर पवित्र जलाचे सिंचन करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी या भागात वृक्षारोपणही केले.
बेंगळुरु शहराचा जो विस्तार झाला आहे, त्यामध्ये या शहराचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ तयार करणारे प्रसिद्ध शिल्पकार राम व्ही. सुतार यांच्या संकल्पनेतून नादप्रभू केम्पेगौडा यांचा पुतळा साकारण्यात आला आहे. या पुतळ्यासाठी 98 टन कांस्य आणि 120 टन पोलादाचा वापर करण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की;
“बेंगळुरू शहराच्या उभारणीमध्ये नादप्रभू केम्पेगौडा यांची भूमिका असामान्य आहे. ते एक दूरदर्शी म्हणून स्मरणात आहेत. केम्पेगौडा यांनी इतर गोष्टींपेक्षा लोककल्याणाला नेहमीच महत्त्व दिले. बंगळुरूमध्ये ‘स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटी’चे उद्घाटन करणे हा माझ्यासाठी बहुमान आहे.’’
या कार्यक्रमाला पंतप्रधानांच्या समवेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर उपस्थित होते.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1875201)
Visitor Counter : 680
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam