रेल्वे मंत्रालय
शंभर टक्के विद्युतीकरण या अभियानाच्या पुर्तातेकडे रेल्वेची वाटचाल सुरु
भारतीय रेल्वेने देशातील एकूण ब्रॉडगेज जाळ्यापैकी 82% मार्गाचे विद्युतीकरण केले पूर्ण
एप्रिल-ऑक्टोबर 2022 दरम्यान 1223 किलोमीटर मार्गाचे (आरकेएमचे) विद्युतीकरण
विद्युतीकरणामुळे इंधनाच्या चांगल्या वापराला चालना
Posted On:
10 NOV 2022 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2022
भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या 100 टक्के विद्युतीकरणाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. यामुळे इंधनाचा योग्य प्रकारे वापर होउून, इंधनावर होणारा खर्च कमी होईल. त्यामुळे मौल्यवान परकीय चलनाची बचत होणार आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात, ऑक्टोबर 2022 पर्यंत भारतीय रेल्वेने 1223 किलोमीटर रेल मार्गाचे (आरकेएमचे) विद्युतीकरण पूर्ण केले आहे. याआधीच्या वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये याच कालावधीत 895 आरकेएमचे विद्युतीकरण केले होते. मागील वर्षापेक्षा या आर्थिक वर्षात 36.64% अधिक काम विद्युतीकरणाचे झाले आहे.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात 2021-22 या कालावधीत 6,366 आरकेएमचे विक्रमी विद्युतीकरण झाले होते. ही गोष्ट इथे उल्लेखनीय आहे. यापूर्वी, 2020-21 मध्ये सर्वाधिक विद्युतीकरण 6,015 आरकेएम झाले होते.
भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज नेटवर्कचे (कोंकण रेल्वे महामंडळासह) 31.10.2022 पर्यंत 65,141 आरकेएमपैकी 53,470 ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. हे प्रमाण एकूण ब्रॉडग्रेड नेटवर्कच्या 82.08% इतके आहे.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874957)
Visitor Counter : 228