ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
स्पेशल कॅम्पेन 2.0 अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाकडून जनतेच्या 156 तक्रारी निकालात आणि 70% तक्रारींना उत्तरे
मोहिमे अंतर्गत 7061 फाईल्सचे डिजीटलीकरण
विभागाची मुख्यालये व अन्य कार्यालयांमध्ये वृक्षारोपण
Posted On:
28 OCT 2022 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022
देशभरातील कार्यालये, संस्था व त्यांच्या आवारात स्वच्छता राखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्पेशल कॅम्पेन 2.0 मध्ये ग्राहक व्यवहार विभाग सहभागी झाला आहे. भारतीय मानांकने संस्था, राष्ट्रीय चाचणी संस्था, राष्ट्रीय ग्राहक सहकार महासंघटना आणि राष्ट्रीय ग्राहक आयुक्तालये यांच्या एकूण 73 कार्यालयांमध्ये 2 ऑक्टोबर 2022 पासून मोहिमे अंतर्गत उपक्रम राबविण्यात येत असून 31 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची सांगता होणार आहे.
स्पेशल कॅम्पेन 2.0 राबविण्यासाठी तयारीच्या टप्प्यात विभागाने स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून सार्वजनिक तक्रार गाऱ्हाणी प्रकरणे आणि नोंदींच्या दस्तावेजांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले. त्या नंतर केंद्रीय सार्वजनिक कार्य विभाग आणि देखभाल करणाऱ्या अन्य कंत्राटदारांशी चर्चा करून सर्व 73 कार्यालयांमध्ये हा उपक्रम हाती घेतला.
कॅम्पेन अंतर्गत, खासदारांकडून आलेल्या एकूण पाच संदर्भ प्रकरणांना उत्तरे पाठविण्यात आली, मंत्र्यांदरम्यानच्या दोन संदर्भांवर टिपण्णी करण्यात आली. 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत 1516 सार्वजनिक गाऱ्हाण्यांपैकी 70% म्हणजे 1,074 गाऱ्हाण्यांना समाधानकारक उत्तरे पाठविण्यात आली आणि 156 तक्रारींचे निवारण करण्यात आले.
नोंदी दस्तावेज व्यवस्थापनात 15,285 नस्ती निवडून त्यातील 13,131 नस्तींची समिक्षा करून 7061 नस्तींचे डिजिटलीकरण पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या नस्ती भौतिक स्वरुपातून काढून टाकणे शक्य झाले. ई-ऑफिस उपक्रमांतर्गत निवडलेल्या 602 फाईल्सपैकी 473 ई-फाईल्स आवश्यक कार्यवाहीअंती बंद करण्यात आल्या. निवडलेल्या नोंदींपैकी 86% प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. स्वच्छता मोहिमे अंतर्गत भंगार विक्रीतून विभागाला रु. 2,38,268 /- मिळाले असून जवळपास 5,121 चौरस फूट जागा मोकळी झाली आहे.

विभागाच्या देशभरातील कार्यालयांच्या आवारात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये विभागांतर्गत येणाऱ्या विविध संस्था व कार्यालयांच्या आवारात 500 रोपे लावण्यात आली आहेत. तसेच, ऊर्जा-कार्यक्षम दिवे, दिव्यांची व्यवस्था आणि एलईडी दिवे लावण्याची व्यवस्था विभागांतर्गत संस्था व कार्यालयांच्या आवारात करण्यात आली आहे.
विभागांतर्गत येणाऱ्या संघटनांनी भंगाराची नियमितपणे विल्हेवाट लावण्यासाठी संबंधित सरकारी यंत्रणेसह सामंजस्य करार केले आहेत. बाजारपेठांमध्ये जागरूकता अभियान राबविले व त्यात तक्रारी नोंदविण्यासाठी असलेली ऑनलाईन प्रणाली ई-दाखिल पोर्टल व त्याचे प्रातिनिधीक ‘जागृती’ चिन्ह याविषयी माहिती दिली.
कॅम्पेन व तयारीच्या टप्प्यात, विभागाने गाझियाबाद इथल्या कार्यालयात अंतर्गत बदल केले असून त्यामध्ये धान्य चाचणी प्रयोगशाळेची जागा व त्याकडे जाणाऱ्या मार्गाच्या दिशा दर्शविणारी प्रतिकृतीचे पुनर्निर्माण केले आहे.
S.Thakur/R.Bedekar/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1871549)