आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील कोविड-19 लसीकरणाची व्याप्ती 219.58 कोटींपेक्षा जास्त


12 ते 14 वयोगटातील 4.12 कोटींहून अधिक किशोरांना दिली लसीची पहिली मात्रा

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 23,193

गेल्या 24 तासात 1,112 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रूग्ण बरे होण्याचा दर 98.77%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.06%

Posted On: 27 OCT 2022 9:45AM by PIB Mumbai

भारतात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण झालेल्यांच्या संख्येने आज सकाळी 7 वाजेपर्यंत 219.58 कोटींचा आकडा (2,19,58,84,786) ओलांडला.

12 ते 14 वर्षे वयोगटाच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाला 16 मार्च 2022 पासून देशात सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत, 4.12 कोटींपेक्षा जास्त (4,12, 39,308) किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देऊन झाली आहे. तसेच, 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना खबरदारीची मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरुवात करण्यात आली.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरण झालेल्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415387

2nd Dose

10120566

Precaution Dose

7071195

FLWs

1st Dose

18437141

2nd Dose

17720444

Precaution Dose

13747649

Age Group 12-14 years

1st Dose

41239308

2nd Dose

32358008

Age Group 15-18 years

1st Dose

62008237

2nd Dose

53327225

Age Group 18-44 years

1st Dose

561412960

2nd Dose

516314283

Precaution Dose

100616408

Age Group 45-59 years

1st Dose

204048437

2nd Dose

197074452

Precaution Dose

50730358

Over 60 years

1st Dose

127681210

2nd Dose

123218908

Precaution Dose

48342610

Precaution Dose

22,05,08,220

Total

2,19,58,84,786

 

 

भारतात सध्या कोविड-19 बाधितांची संख्या 20,821 आहे. हे प्रमाण देशातील एकूण कोविड-19 बाधितांच्या संख्येच्या 0.05% इतके आहे.

देशात रूग्ण बरे होण्याचा दर आता 98.77% इतका आहे. गेल्या 24 तासांत 1,892 रूग्ण बरे झाले आहेत. साथ सुरू झाल्यापासून आजवर बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,40,97,072 इतकी आहे.

बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4.40 कोटींपेक्षा जास्त आणि रुग्ण बरे होण्याचा दर 98.77%.

गेल्या 24 तासांत देशात 1,112 नवे कोविड-19 बाधितांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत 2,000 पेक्षा कमी नव्या कोविड-19 बाधितांची नोंद

गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या एकूण 1,44,491 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आजवर 90.04 कोटींपेक्षा जास्त (90,04,17,092) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आता 1.06% इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.77% इतका आहे.

पॉझिटिव्हिटीचा आलेख (साप्ताहिक सरासरीनुसार)

आजचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.77%

***

S.Thakur/R.Jathar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871206) Visitor Counter : 209