माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांच्या भेटीमुळे अहमदाबाद दूरदर्शन केंद्राच्या विशेष मोहीम 2.00 ला यश
Posted On:
25 OCT 2022 6:03PM by PIB Mumbai
स्वच्छता मोहीम आणि कालबाह्य निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट (SCPDM) 2.0 या विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी अहमदाबाद दूरदर्शन केंद्राला भेट दिली.
या भेटीमुळे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आणि त्यांनी या मोहिमेला यश मिळवून देण्याचे निश्चित केले. या भेटीमुळे उत्साहीत झालेल्या अहमदाबाद दूरदर्शन केंद्राने निरुपयोगी बाबींची विल्हेवाट (SCPDM) 2.0 या मोहिमेअंतर्गत खालील गोष्टी साध्य केल्या.
कार्यालयाने दूरदर्शन केंद्राच्या परिसरातून जवळपास 44 ट्रॅक्टर भरेल एवढे गवत, तणआणि कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावली.
वाढलेल्या तणामध्ये अनेक विषारी सरपटणारे प्राणी सापडले त्यांना नष्ट करण्यात आले.
8558 किलोग्रॅम कागदाचा कचरा, 1250 किलोग्रॅम प्लास्टिक कचरा, 1355 किलोग्रॅम लाकडी कचरा आणि 2755 किलोग्रम धातूचा कचरा यांची विल्हेवाट लावण्यात आली.
या सर्व रद्दीच्या विल्हेवाट आणि विक्रीतून वीस लाख चाळीस हजार एवढे पैसे आत्तापर्यंत मिळाले आहेत.
1070 प्रत्यक्ष फायलींचा आढावा घेऊन 94 फाइल्स टाकून देण्यात आल्या. या मोहिमेमुळे साधारणतः 3900 चौरस फीट अंतर्गत जागा आणि 10000 चौरस फीट एवढी प्रांगणातील जागा मोकळी होऊ शकली.
***
R.Aghor/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870849)
Visitor Counter : 178