पंतप्रधान कार्यालय
मध्यप्रदेशातील रेवा येथे दुर्दैवी रस्ता अपघातातील मृतांबद्दल पंतप्रधानांची शोकसंवेदना
पीएमएमआरएफमधून जाहीर केले सानुग्रह अनुदान
प्रविष्टि तिथि:
22 OCT 2022 11:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातील रेवा येथे झालेल्या दुःखद रस्ता अपघातातील मृतांबद्दल शोक संवेदना व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी मृताच्या कुटुंबियांप्रती 2 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना प्रत्येकी 50,000 रूपयांची मदत देण्यात येईल. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन शक्य ती सर्व मदत अपघातग्रस्तांना पोहचवत आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट संदेशात म्हटले आहे की,
“मध्यप्रदेशातील रेवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात ह्रदयविदारक आहे. यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती माझ्या शोकसंवेदना आहेत. याबरोबरच सर्व जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना शक्य ती सर्व मदत देण्याच्या कामी गुंतले आहे.”
“या बस अपघातात प्रत्येक मृताच्या कुटुंबियांस पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून 2 लाख रूपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले असून जखमींसाठी 50,000 रूपये जाहीर केले आहेत.”
***
S.Thakur/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1870203)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam