पंतप्रधान कार्यालय
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर, 22 ऑक्टोबर रोजी - मध्य प्रदेशातील 'पीएमएवाय-जी'च्या 4.5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या ‘गृह प्रवेश’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान होणार सहभागी
मध्य प्रदेशात सुमारे 29 लाख घरकुलांचे काम पूर्ण; योजनेअंतर्गत 35,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च
प्रविष्टि तिथि:
19 OCT 2022 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2022
मध्य प्रदेशातील सतना येथे प्रधानमंत्री घरकूल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 4.51 लाख लाभार्थींचा गृहप्रवेश धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर होणार आहे. दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ‘गृह प्रवेशम’ कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
देशातील प्रत्येक नागरिकाला सर्व मूलभूत सुविधांसह स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधानांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सतना येथे बांधण्यात आलेली घरकुले म्हणजे, या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत, मध्य प्रदेशात आतापर्यंत सुमारे 38 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत आणि सुमारे 29 लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यासाठी 35,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे.
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1869321)
आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam