सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांतील उपक्रमांचे पुनर्वर्गीकरण होण्यापूर्वी वरील बदलाच्या तारखेपासून तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी सर्व करविरहीत लाभ मिळणे सुरू रहाण्यासाठी अधिसूचना जारी
प्रविष्टि तिथि:
19 OCT 2022 11:24AM by PIB Mumbai
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने, दिनांक 18.10.2022 रोजी S.O. 4926 (E) या अधिसूचनेद्वारे सूचित केले आहे,की
प्रकल्पाचे स्थान आणि यंत्रसामग्री, उपकरणे किंवा उलाढाल किंवा दोन्हीमधील गुंतवणुकीच्या बाबतीत लाभदायक बदल झाल्यास आणि परिणामी त्या उद्योगांचे पुनर्वर्गीकरण झाल्यास,अशा उद्योगांना वरील बदल केल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी,सर्व करविरहित लाभ मिळत राहतील.
हा निर्णय एमएसएमईने सर्व हितसंबंधितांशी चर्चा केल्यानंतर घेण्यात आला असून तोआत्मनिर्भर भारत अभियानाशी सुसंगत आहे. भारत सरकारच्या एमएसएमईने (MSME), नोंदणीकृत एमएसएमई प्रकल्पांना त्यांच्या श्रेणीत होणाऱ्या लाभविषयी बदलांची नोंद घेत पुनर्वर्गीकरणा नंतरही एका वर्षाऐवजी तीन वर्षांसाठी करविरहीत लाभ सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. कर सोडून होणाऱ्या इतर लाभांमध्ये सार्वजनिक खरेदी धोरण, विलंबित देयके इत्यादींसह सरकारच्या विविध योजनांव्दारे दिल्या जाणाऱ्या लाभांचाही समावेश आहे.
***
Gopal C/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1869134)
आगंतुक पटल : 312