गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
पंतप्रधान राजकोटमध्ये ‘इंडिया अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह 2022’ चे करणार उद्घाटन
"भविष्यातील सज्ज शहरी भारत" चे ध्येय साध्य करण्यासाठी धोरणे, कृती योजना आणि पथदर्शी प्रकल्प तयार करण्यासाठी कॉन्क्लेव्हमुळे मदत
शाश्वत विकासासाठी बांधकाम क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानातील संक्रमण काळ लक्षात घेता, क्षितीज विस्तारण्यासाठी कॉन्क्लेव्हमुळे मदत
Posted On:
18 OCT 2022 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 19-21 ऑक्टोबर 2022 या दरम्यान गुजरातमधल्या राजकोट, येथे ‘इंडियन अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह-2022’ (आययूएचसी 2022) या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय परिषदेला, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री; आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, हरदीप सिंग पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर आणि केंद्र आणि राज्यांमधील इतर मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पीएमएवाय-यू या व्यतिरिक्त, इतर शहरी अभियान उदाहरणार्थ - स्वच्छ भारत मिशन, अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत), स्मार्ट सिटीज मिशन, शहरी वाहतूक, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम ), स्वनिधी, या योजना गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालायाद्वारे राबविण्यात येत आहेत.
'इंडिया अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह'मध्ये सर्व भागधारकांना त्यांच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी एक मंच मिळणार आहे. तसेच देशातल्या विविध भू-हवामान क्षेत्रांसाठी उपयुक्त असलेल्या विविध प्रकारच्या गृहनिर्माण बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तंत्रज्ञान, साहित्य आणि प्रक्रियांचे विविध पर्याय जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. सार्वजनिक/खाजगी एजन्सी, संशोधन आणि विकास तसेच तांत्रिक संस्था, बांधकाम संस्था, विकासक, कंत्राटदार, स्टार्ट-अप आणि इतर भागधारकांद्वारे एक सक्षम परिसंस्था तयार होण्यासाठी या परिषदेची मदत होणार आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना (घरमालकांना) नाविन्यपूर्ण, लवकर, वेगाने आणि किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान आणि वापरासाठी साहित्य उपलब्ध होवू शकणार आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत काळादरम्यान शहरी गृहनिर्माणावर लक्ष केंद्रित केले तर “भविष्यातील सज्ज शहरी भारत”चे ध्येय साध्य करण्यासाठी धोरणे, कृती आराखडा आणि पथदर्शी कार्यक्रम तयार करण्यात मदत होणार आहे.
या परिषदेमध्ये वेबकास्टिंग आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह प्रत्यक्ष तसेच आभासी पद्धतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये खालील घटकांचा समावेश असणार आहे.
1.‘एलएचपी’ प्रकल्पाचे उद्घाटन :- गुजरातमध्ये राजकोट येथे ‘एलएचपी’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने देशातल्या सहा राज्यांमध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून ‘एलएचपी’ बांधण्यात येणार आहेत. या सहापैकी एक असलेले राजकोट येथील ‘एलएचपी’ सर्व बाबतीत पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात, ‘मोनोलिथिक कॉंक्रिट कन्स्ट्रक्शन युजिंग टनल फॉर्मवर्क’ नुसार बांधकाम केले आहे. फ्रान्समध्ये जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर 1,144 घरांच्या बांधकामासाठी केला गेला आहे. या तंत्रज्ञानामुळे जलद बांधकाम, टिकाऊपणा, कमी देखभाल सुनिश्चित होते आणि हे काम साधन,सामुग्री-कार्यक्षम आणि आपत्ती-प्रतिरोधक आहे. या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते ‘एलएचपी’ राजकोट प्रकल्पाचे उद्घाटन करून ही घरकुले लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात येतील. याशिवाय विविध प्रकाशने, संग्रह, पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
2. नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धतींवरील राष्ट्रीय प्रदर्शन:- नाविन्यपूर्ण बांधकाम साहित्य, बांधकाम तंत्रज्ञान आणि प्रक्रियांवर एक प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये देशातले आणि परदेशातले प्रदर्शक नवीन आणि नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञान/सामग्रीवरील नमुना मॉडेल्सचे प्रदर्शन करतील. जगभरातील तंत्रज्ञान प्रदाते, देशांतर्गत असलेले स्वदेशी तंत्रज्ञान, देशातील संभाव्य भविष्यातील तंत्रज्ञान (स्टार्ट-अप) यांना एका साध्या ऑनलाइन स्क्रीनिंग प्रक्रियेद्वारे आमंत्रित केले आहे. ‘जीएचटीसी- भारत’ साठी नियुक्त केलेल्या तांत्रिक मूल्यमापन समिती (टीईसी) भारतीय संदर्भात त्यांच्या योग्यतेचे मूल्यमापन आणि मूल्यांकन करेल. या प्रदर्शनामध्ये 200 पेक्षा जास्त तंत्रज्ञान प्रदाते त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील अशी अपेक्षा आहे.
3. गुजरातसह पीएमएवाय-यू अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शन : - पीएमएवाय-यू मिशन सहकारी संघराज्यवादाला प्रोत्साहन देते. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक संदर्भानुसार त्यांची अंमलबजावणी संरचना नव्याने केली आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धतींचा अवलंब करणे, पीएमएवाय-यू च्या इतर गृहनिर्माण योजनांशी अभिसरण, उपजीविका कार्यक्रम, विशेष गटांना घरकुले प्रदान करणे इत्यादी. या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे की, पीएमएवाय-यू च्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये गुजरातसह राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी शहरी मोहिमेचे यश आणि आर्थिक विकास , लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जीवन सुलभतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांचा पथदर्शी कार्यक्रम / कृती योजना तयार करणे.
4.किफायतशीर घरकुलांविषयी चर्चासत्र :-: विविध संवाद, विशिष्ट विषयांवर सत्रे, राउंडटेबल चर्चा, संबंधित भागधारकांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञांबरोबर चर्चा, माहितीचे सामायिकीकरण आणि शहरांचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रगतीबद्दल जाणून घेण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे, राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी, शैक्षणिक संस्था, नागरी संस्था आणि इतर भागधारक देखील सहभागी होणार आहेत.
5. पीएमएवाय-यू पुरस्कार 2021 चे वितरण आणि सत्कार : राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि यूएलबी यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी, गृहनिर्माण मंत्रालयाने पीएमएवाय-यू च्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्टतेसाठी वार्षिक पुरस्कार सुरू केले आहेत. पीएमएवाय-यू पुरस्कार 2021 चे विजेते निवडण्यात आले आहेत. त्यांचा या परिषदेमध्ये सत्कार करण्यात येणार आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जून 2015 पासून पीएमएवाय-यू ची अंमलबजावणी करत आहे. यामुळे देशातील शहरी भागातील सर्व पात्र कुटुंबांना/लाभार्थ्यांना मूलभूत सुविधांसह सर्व हवामानाला योग्य असणारी पक्की घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. योजनेअंतर्गत एकूण 122.69 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत; त्यापैकी सुमारे 105 लाख बांधकामासाठी आधारभूत ठरले आहेत आणि 63 लाखांहून अधिक बांधकाम पूर्ण करून लाभार्थ्यांना घरकुले देण्यात आली आहेत. 31 मार्च 2022 पर्यंत मंजूर केलेली सर्व घरे पूर्ण करण्यासाठी योजनेची मुदत 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमएवाय-यू च्या कक्षा आता अधिक विस्तारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक तंत्रज्ञान उप-मिशन (टीएसएम) स्थापन करण्यात आले आहे, त्यामुळे नाविन्यपूर्ण गोष्टींचा अवलंब करणे सुलभ झाले आहे. किफायतशीर, जलद आणि दर्जेदार घरांच्या बांधकामासाठी टिकाऊ, पर्यावरणपूरक आणि आपत्ती-प्रतिरोधक तंत्रज्ञान आणि बांधकाम साहित्याचा वापर करणे शक्य होत आहे.
नवीन आणि नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञान आणि प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी, ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज- इंडिया (जीएचटीसी- भारत) ची सुरुवात जानेवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. याचा उद्देश शाश्वत, हरित आणि आपत्ती प्रतिरोधक बांधकामाचे जागतिक स्तरावर उपलब्ध असलेले सर्वोत्तम तंत्रज्ञान जाणून घेणे आणि ते मुख्य प्रवाहात आणणे आहे. बांधकाम क्षेत्रातल्या तंत्रज्ञानाचा संक्रमणाचा काळ लक्षात घेता, जीएचटीसी- भारत अंतर्गत, ‘कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इंडिया (सीटीआय) – 2019: एक्स्पो-कम-कॉन्फरन्स’ चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 2 मार्च 2019 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये करण्यात आले होते.
इंदूर, राजकोट, चेन्नई, रांची, आगरतळा आणि लखनौ येथे सहा एलएचपी प्रकल्प बांधण्यासाठी जीएचटीसी- भारत उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या निवडक 54 जणांच्या सूचीमध्ये, जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानांमधून सहा वेगळ्या तंत्रज्ञानाची निवड करण्यात आली. सर्व 6 एलएचपींची पायाभरणी पंतप्रधानांनी 01.01.2021 रोजी केली होती. 6 एलएचपी प्रकल्पांपैकी चेन्नईच्या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते 26 मे 2022 रोजी करण्यात आले. एलएचपी राजकोट प्रकल्प उद्घाटनासाठी सज्ज आहे. उर्वरित चार एलएचपी प्रकल्पांचे बांधकाम आता अखेरच्या टप्प्यात आहेत.
याशिवाय, 5 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तर प्रदेशातल्या लखनौ, येथे 'भारतीय गृहनिर्माण तंत्रज्ञान मेळावा ' (आयएचटीएम) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये परवडणाऱ्या घरांसाठी कमी आणि मध्यम-वाढीच्या संरचनेसाठी स्वदेशी पर्यायी/शाश्वत बांधकाम साहित्य आणि नाविन्यपूर्ण बांधकाम प्रणाली/तंत्रज्ञान यांना प्रोत्साहन देण्यात आले. आयएचटीएमचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. आयएचटीएमअंतर्गत, 84 स्वदेशी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, साहित्य आणि प्रक्रियांची निवड करण्यात आली.
‘इंडियन अर्बन हाऊसिंग कॉन्क्लेव्ह’ मुळे शाश्वत विकासासाठी क्षितिज विस्तारण्याचे आणि बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञानाचे संक्रमण घडवून आणण्यास मदत होणार आहे. यासाठी जागतिक आणि स्वदेशी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, साहित्य आणि जीएचटीसी-भारत अंतर्गत तसेच आएचटीएम अंतर्गत निवडून सूची करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जगभरातील विविध भागधारकांद्वारे विकसित केली जाणार आहे. बांधकाम क्षेत्रातल्या सर्व संबंधितांना एका समान मंचावर आणण्याचे आणि प्रदर्शित करण्याचे काम या परिषदेमुळे होणार आहे.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1869000)
Visitor Counter : 180