पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 19 ऑक्टोबर रोजी पर्यटक पोलीस योजनेवरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार

Posted On: 18 OCT 2022 3:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  ऑक्टोबर  2022

पर्यटन मंत्रालयाने गृह मंत्रालय आणि पोलीस संशोधन आणि विकास मंडळाच्या (BPR&D) सहयोगाने 19 ऑक्टोबर, 2022 रोजी समान पर्यटक पोलीस योजनेची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागाचे महासंचालक/महानिरीक्षक  यांची, नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या परिषदेचे प्रमुख पाहुणे असतील. या परिषदेला पर्यटन, सांस्कृतिक आणि डीओएनईआर मंत्री जी. किशन रेड्डी उपस्थित राहणार आहेत.   

पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक आणि गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, गृह सचीव अजय कुमार भल्ला, पर्यटन सचीव अरविंद सिंह, महासंचालक(बीपीआर& डी, एमएचए) बालाजी श्रीवास्तव, सहसचिव (परदेश विभाग, एमएचए), राजस्थान, केरळ, गोवा आणि मेघालय राज्याचे पर्यटन सचिव, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे डीजी/आयजी, आणि एमएचए, एमओटीबीपीआर&डी चे इतर वरिष्ठ अधिकारी देखील या परिषदेला उपस्थित राहतील.

पर्यटकांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, हे लक्षात घेऊन, पर्यटन स्थळे आणि परिसरात देशातल्या आणि परदेशी पर्यटकांना सुरक्षित परिसंस्था उपलब्ध करून देण्यासाठी विशिष्ट भूमिका, जबाबदाऱ्या आणि प्रशिक्षण पैलूंसह पर्यटक केंद्रित पोलीस यंत्रणा विकसित करण्यासाठी समान पर्यटक पोलीस योजना देशपातळीवर लागू करण्याच्या उद्देशाने, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागाच्या डीजी/आयजी च्या या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.    

या परिषदेत, बीपीआर&डी ने तयार केलेल्या 'पर्यटक पोलिस योजना' या अहवालावर चर्चा होईल आणि बीपीआर&डी आपल्या अहवालाचा निष्कर्ष आणि शिफारशी एमएचए, एमओटी आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या प्रतिनिधींसमोर ठेवेल. परदेशी आणि देशांतर्गत पर्यटकांच्या सुरक्षीततेच्या गरजा लक्षात घेऊन, त्या अनुषंगाने काम करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित पप्रदेशांच्या पोलिसांचे समर्पित पथक विकसित करणे, ही या परिषदेमागची संकल्पना आहे.  

पर्यटन मंत्रालय, गृह मंत्रालय आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस संशोधन आणि विकास मंडळांना एकाच व्यासपीठावर आणणे हे या पर्यटक पोलीस योजना राष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे, यामुळे ते राज्ये/केंद्रशासित प्रदेश पोलीस विभागाशी समन्वय साधून, त्यांच्यामध्ये समान पर्यटक पोलीस धोरणाची देश पातळीवर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी परदेशी आणि स्थानिक पर्यटकांच्या विशिष्ट गरजांबाबत जाणीव जागृती करतील. यामुळे जागतिक स्तरावर भारतामधील पर्यटकांच्या सुरक्षेबाबतची धारणा बदलेल आणि भारताला, जगातील भेट द्यायलाच हवी, असे ठिकाण बनवण्यात मदत होईल.

 

G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1868828) Visitor Counter : 200