आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मिथक विरुद्ध तथ्ये


न्यूमोकोकल लसीच्या तुटवड्याबाबत माध्यमे करत असलेला दावा चुकीचा आणि दिशाभूल करणारा

पीसीव्हीच्या  70.18 लाखाहून अधिक मात्र  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत

Posted On: 08 OCT 2022 2:42PM by PIB Mumbai

 

जानेवारी ते सप्टेंबर 2022 या कालावधीत सरकारने पुरवठा केलेल्या पीसीव्हीच्या 3.27 कोटींहून अधिक मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वापरल्या

एका राष्ट्रीय दैनिकात अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका वृत्तात देशात न्यूमोकोकल लसीचा तुटवडा असल्याचा दावा केला आहे. या वृत्तात राज्य आरोग्य अधिकार्‍यांच्या हवाल्याने (यामध्ये  महाराष्ट्रातील SIO चा समावेश आहे ) असे म्हटले आहे कीनिविदा काढण्यात झालेल्या विलंबामुळे देशभरातील हजारो बालकांच्या लस घेण्याच्या  वेळापत्रकात एक महिन्यापेक्षा जास्त काळ विलंब झाला आहे.

या बातमीतील अहवाल चुकीचा आहे आणि चुकीची माहिती प्रदान करतो.

7 ऑक्टोबर  2022 पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पीसीव्ही मात्रांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशभरात पीसीव्ही च्या  एकूण 70,18,817 (70.18 लाख) मात्र सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यात उपलब्ध असलेल्या पीसीव्ही च्या 3,01,794 (3.01 लाख) मात्रांचा  समावेश आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2022 या कालावधीत केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या पीसीव्ही च्या 3,27, 67, 028 (3.27 कोटी) अधिक मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी वापरल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात वापरल्या गेलेल्या पीसीव्ही च्या 18,80,722 (18.80 लाख) मात्रांचा  समावेश आहे.

वर्ष 2022-23 साठी पीसीव्ही मात्रांच्या खरेदीसाठी आवश्यक असलेला पुरवठा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखील सुरू झाला आहे.

न्यूमोनिया हे बालमृत्यूचे एक प्रमुख कारण आहे आणि भारत सरकारने या समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत.

न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस (पीसीव्ही) सरकारने 2017 मध्ये बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश. या भारतातील सर्वाधिक प्रभावित पाच राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सादर केली.  त्यानंतर संपूर्ण देशात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम (यूआयपी) अंतर्गत  पीसीव्ही  मात्रांचा पुरवठा सर्वत्र करण्यात आला.

पीसीव्ही आता भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक बनला आहे आणि 27.1 दशलक्ष इतक्या नवजात  शिशूंसाठी  विनामूल्य उपलब्ध आहे. बालकांना ही लस  6 आठवडे, 14 आठवडे आणि 9-12 महिन्यांत बूस्टर डोस अंतर्गत अंतराने दिली जाते.

***

H.Raut/B.Sontakke/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1866040) Visitor Counter : 197