पंतप्रधान कार्यालय

कर्नल एच के सचदेव (निवृत्त) यांच्या पत्नी उमा सचदेव यांची पंतप्रधानांनी भेट घेतली

Posted On: 07 OCT 2022 6:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उमा सचदेव यांची भेट घेतली. 90 वर्षीय उमा सचदेव यांनी त्यांचे दिवंगत पती कर्नल एचके सचदेव (निवृत्त) यांनी लिहिलेल्या 3 पुस्तकांच्या प्रती पंतप्रधानांना भेट म्हणून दिल्या.

ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

“आज मी उमा सचदेव यांची भेट घेऊन स्मरणीय संवाद साधला. त्या 90 वर्षांच्या आहेत आणि चांगला जोम तसेच आशावादाची उर्जा यांचे उत्तम वरदान त्यांना लाभलेले आहे. त्यांचे पती कर्नल एचके सचदेव (निवृत्त)हे नावाजलेले, आदरणीय लष्करी अधिकारी होते. उमाजी या जनरल @Vedmalik1 जी यांच्या मावशी आहेत.

“पती कर्नल एचके सचदेव (निवृत्त) यांनी लिहिलेल्या 3 पुस्तकांच्या प्रती उमाजींनी मला भेट म्हणून दिल्या. त्यापैकी दोन पुस्तके भगवद्गीतेशी संबंधित असून तिसरे, ‘ब्लड अँड टियर्स’ हे पुस्तक म्हणजे फाळणीच्या कालखंडात कर्नल एचके सचदेव (निवृत्त) यांना आलेले वेदनादायी अनुभव आणि या अनुभवांचा त्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम याचे हेलावून टाकणारे इतिवृत्त आहे.”

“फाळणीच्या वेदना सहन करून, त्या जखमांच्या आठवणीतून सावरून आपली आयुष्ये पुढे सुरु ठेवणाऱ्या आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली म्हणून दर वर्षी येणारा 14 ऑगस्टचा दिवस ‘विभाजन विभिषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत आम्ही चर्चा केली. मानवी मनाची लवचिकता आणि सहनशीलता यांचे यातून दर्शन घडते आहे.”

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865890) Visitor Counter : 160