पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगालमधील जलपैगुडी इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदानाची घोषणा
Posted On:
06 OCT 2022 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2022
पश्चिम बंगालमधील जलपैगुडी इथे दुर्गापूजेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
या अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे;
“पश्चिम बंगालच्या जलपैगुडी इथे दुर्गापूजेदरम्यान झालेल्या अपघाताचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. ह्या अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक संवेदना व्यक्त करतो. PM @narendramodi ”
"या दु:खद घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपये मदत दिली जाईल, तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. PM @narendramodi"
* * *
M.Pange/R.Aghor/D.Rane
(Release ID: 1865498)
Visitor Counter : 219
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam