पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंती दिनी आदरांजली
दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयातून लालबहादूर शास्त्री यांच्या दालनातील काही छायाचित्रे केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2022 9:15AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली. तसेच पंतप्रधानांनी शास्त्री यांच्या विचारांवरील एक व्हिडिओ चित्रफीतही सामायिक केली. मोदी यांनी दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयातील शास्त्री यांचा जीवनप्रवास आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या कामगिरी दर्शवणारी छायाचित्रेही सामायिक केली आहेत.
एका ट्विट संदेशात मोदी यांनी म्हटले आहे की,
लाल बहादूर शास्त्रीजी यांची त्यांचा साधेपणा आणि निर्णयक्षमतेसाठी संपूर्ण भारतातून प्रशंसा केली जाते. आमच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या क्षणी त्यांनी दाखवलेले कठोर नेतृत्वाचे गुण कायम स्मरणात रहातील. त्यांना जयंतीदिनी माझे अभिवादन.
आज शास्त्रीजींच्या जयंती दिनी मी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयातील काही छायाचित्रे सामायिक करत आहे. त्यात त्यांचा जीवनप्रवास आणि पंतप्रधान म्हणून साध्य केलेली कामगिरी त्यातून दिसते. या संग्रहालयाला भेट द्या, असा माझा आग्रह आहे.
***
S.Pophale/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1864350)
आगंतुक पटल : 281
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam